BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2493 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

कोरोना पार्श्वभूमीवर श्रीराम शोभायात्रा रद्द ........ घरावर रोषणाई आणि भगवा लावण्याचे समितीचे आवाहन

कोरोना पार्श्वभूमीवर श्रीराम शोभायात्रा रद्द

घरावर रोषणाई आणि भगवा लावण्याचे समितीचे आवाहन


न्यूज कट्टा /  भंडारा, 5 एप्रिल   

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने यावर्षी प्रभू श्रीरामाची शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच गुढीपाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याचे श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

श्री रामनवमी शोभायात्रा समिती सदस्यांची आभासी पद्धतीने बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आला. शोभायात्रा समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुढी उभारली जाते. परंतु यावेळी परिस्थिती विपरित आहे. कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने घराबाहेर न पडणे आणि गर्दी टाळणे हाच एक उपाय संक्रमण थांबविण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेता समितीच्यावतीने नऊ दिवस होणारे हे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोबतच अनेक वर्षांपासून सुरु असलेली शोभायात्रेची परंपराही कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही खंडित होणार आहे. 24 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. मात्र यावेळी शोभायात्रा न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. शोभायात्रा काढली जाणार नसली तरी खामतलाव परिसरातील श्रीराम मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मसोहळा कोरोनचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे.

गुढीपाडवा आणि श्रीराम नवमीच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी रोषणाई करावी, भगवे झेंडे लावून गुढी उभारावी असे आवाहन श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीला धनंजय दलाल, हेमंत आंबेकर, जॅकी रावलानी, किरीट पटेल, धनंजय ढगे, व इतर सदस्य हजर होते. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links