BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

158 Views

By NewsKatta


सोलापूर 

ग्लोबल शिक्षक डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह 

ग्लोबल शिक्षक डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह 

न्यूज़ कट्टा /  सोलापूर 

तब्बल 7 कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवून नुकतेच प्रसिद्धीच्या झोतात आलेले  सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जि. प. शिक्षक रणजीतसिंह डिसले आज कोव्हिड पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी कळविले आहे. 

डिसले गुरुजींनी त्यांच्या व्हाटस अपवर  आज बुधवार रोजी सायंकाळी 5.45 वाजता या बाबतीत स्टेटस अपडेट केला आहे. "विशेष आवाहन, लक्षणे दिसत असल्याने मी कोव्हिड टेस्ट करून घेतली असून ती पॉझिटिव्ह आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली टेस्ट करून घ्यावी." असे विशेष आवाहन त्यांनी व्हाटसअप्पच्या माध्यमातून केले आहे. 
झेडपी गुरुजी रणजीतसिंह डिसले यांनी 3 डिसेंबर रोजी  वार्की फाउंडेशन दुबई व यूनेस्को स्थापित 7 कोटींचा प्रतिष्ठित ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला होता. पुरस्कार जाहीर होताच सर्व स्तरांवरून डिसले गुरुजींवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. नुकतेच राज्याचे राज्यपाल महामहीम भागतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष नेते व इतर अनेक लोकप्रतिनिधिंशी त्यांची भेट झाली होती. 
राजधानीवरुन गावी येताच आज त्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर लक्षणे जाणविल्याने तपासणी करून घेतली असता  चाचणीत ते व त्यांची सौ. पॉझिटिव्ह आल्याचे कळताच त्यांनी हे विशेष आवाहन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links