BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

6971 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा जिल्हा रुग्णालयात डॉक्टर्सचा तुटवडा : जिल्हाधिकाऱ्यांची मदतीची हाक

भंडारा जिल्हा रुग्णालयात डॉक्टर्सचा तुटवडा : जिल्हाधिकाऱ्यांची मदतीची हाक

- शासनातर्फे वॉक इन अपॉईंटमेंट

 

न्यूज कट्टा

भंडारा, दि. 9 : एका अभूतपूर्व घटनाक्रमात भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडाऱ्यातील खासगी इस्पितळांत सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा पुरविण्याची विनंती केली आहे. जिल्हयावर असे संकट पहिल्यांदाच आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा गंभीर तुटवडा भासत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर यांचेशी चर्चा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांचा तसेच नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे असे सांगितले. त्यासाठी शासनातर्फे 'वॉक इन अपॉईंटमेंट' करण्यात येत आहे जेणेकरून भंडाऱ्यातील जास्तीत जास्त खाजगी डॉक्टर्सनी शासकीय रुग्णालयात आपल्या सेवा द्याव्यात.

एका पत्रकाद्वारे व समाज माध्यमांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की एमबीबीएस झालेले विद्यार्थी, नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेले व डॉक्टर यांच्या सेवेची शासकीय आरोग्य विभागाला नितांत गरज आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणू अधिक तीव्र असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने इलाज होणे गरजेचे आहे. अशावेळी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ रुग्णांना होऊ शकतो असे त्यांनी नमूद केले. आरोग्य विभागाने नर्स भरतीसाठी यापूर्वी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र अपेक्षित रिस्पॉन्स मिळाला नाही. आता परिस्थिती कठीण होत असताना डॉक्टर व नर्स यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सेवा द्याव्यात असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. शासकीय आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टर सुद्धा आपल्या सेवा देऊ शकतात. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्या थेट संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. आपल्या सेवा गरीब व गरजू व्यक्तींना जीवन प्रदान करणाऱ्या ठरणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त डॉक्टर व नर्सनी आपल्या सेवा द्याव्यात असे ते म्हणाले.

या कठीण समयी डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांनी शासकीय रुग्णालयात आपल्या सेवा देण्यासाठी पुढे यावे अशी अपील आय. एम. ए. तर्फे डॉ. नितीन तुरस्कर यांनी केली आहे.

भंडारा शहरापासून 60 किलोमीटर परिघात सेवा देणारे सर्वात मोठे रुग्णालय म्हणजे भंडारा जिल्हा रुग्णालय. मागील काही दिवसांत कोरोना पेशंटची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात  7600 अॅक्टिव कोरोना केसेस आहेत. येणाऱ्या काळात यात घट होण्याची चिन्हे नाहीत. एकूण दैनंदिन कोरोना संख्या आणि मृत्यू दर बघता नागपूर पाठोपाठ भंडारा जिल्ह्याचा क्रमांक आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links