BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1555 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नागपूर

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत

 

न्यूज कट्टा ब्यूरो

नागपूर, दि. 13 एप्रिल

देशात आज विविध राज्यांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तेलंगण आणि आंध्र प्रदेशात आज ‘उगाडी’ तर कर्नाटकात ‘युगादी’ सण, साजरा केला जात आहे. तमिळनाडूमध्ये ‘पुथांदू’, केरळमध्ये ‘विशू’, पंजाबात ‘वैसाखी’, ओडिशामध्ये ‘पाना संक्रांती’ आणि पश्चिम बंगालमध्ये ‘बोहाग बिहू’ हे सण स्थानिक परंपरेनुसार साजरे होत आहेत.

नवीन वर्षानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या या विविध सणांमधून भारताची सांस्कृतिक समृद्धी दिसून येते, असं राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या सणांमुळे समाजात शांतता आणि एकता निर्माण होण्यास मदत होते, असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना, हे नवीन वर्ष जनतेला आनंदाचं आणि समृद्धीचं जावो, अशी मनोकामना व्यक्त केली.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links