BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

153 Views

By NewsKatta


नागपूर 

अदानी, अंबानी, रिलायंस, रामदेव यांच्या सर्व प्रॉडक्ट्सवर बहिष्कार !

अदानी, अंबानी, रिलायंस, रामदेव यांच्या सर्व प्रॉडक्ट्सवर बहिष्कार !
-  ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष - लोकजागर

न्यूज़ कट्टा / नागपूर 
शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे.  मोदी सरकार मात्र निर्लज्जपणे त्याची टवाळी करते आहे. शेतकऱ्यांची बदनामी देखील करत आहे. सारा देश अदानी - अंबानी - रामदेव यांच्या सारख्या लुटारु प्रवृत्तीच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे ! शेतकऱ्यांची ही सैतानी लूट म्हणजेच.. खरं तर देशद्रोह आहे..! अशी तीव्र प्रतिक्रिया  लोकजागर पार्टीचे अध्यक्ष  ज्ञानेश वाकुडकर यांनी  व्यक्त केली आहे. असल्या लुटारू कंपन्यांच्या सर्व प्रॉडक्ट्सवर बहिष्कार घालण्याचं आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी  लोकजागर तर्फे १४  डिसेंबरपासून बहिष्काराची सुरुवात करत असल्याचे लोकजागर पार्टीचे अध्यक्ष  ज्ञानेश वाकुडकर यांनी कळविले आहे. 

या बहिष्काराची सुरुवात अंबानी यांच्या  GIO चे सिमकार्ड दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करण्यापासून केली जाईल ! शेतकऱ्यांना साथ द्या.. बहिष्कारात सहभागी व्हा ! असे आवाहनही ज्ञानेश वाकुडकर यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links