BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

44598 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

अखेर पर्दाफाश....रेमडेसिव्हारचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक

अखेर पर्दाफाश....रेमडेसिव्हारचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक 
गैरमार्गाने विक्री करणाऱ्यांत दोन महिला नर्सचा समावेश 

 

न्यूज कट्टा 
भंडारा, दि. 1  मे: भंडारा शहरातील रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून चढ्या दराने विकून काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने सापळा रचून दि. 30 एप्रिल शुक्रवार रोजी अटक केली. अटक झालेल्या आरोपीमध्ये दोन महिला नर्सचा समावेश असून त्यांच्याकडून 4 रेमडेसिवीर इंजेक्शन व मोठ्या प्रमाणात चोरलेल्या औषधीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

     भंडारा जिल्ह्यात कोरोनाने लोक त्रस्त असून आजची अॅक्टिव रुग्णांची संख्या 10699 इतकी आहे. ऑक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन साठी लोकांची भटकंती सुरू आहे. आपल्या स्वकीयांचे जीव वाचवण्याकरिता लोक चढया दराने इंजेक्शन, औषधी आणि ऑक्सिजनचा ‘जुगाड’ करत आहेत. अशातच ‘विपदा मे संधी’ शोधणाऱ्यांनी इंजेक्शन, औषधी आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करायला सुरुवात केली. मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांचे फावले कारण काळाबाजार खुलेआम सुरू असताना सुद्धा जिवाच्या भीतीपाई अनेक लोक गप्प बसलेले होते. या गैरमार्गाची माहिती पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अवर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निदर्षनास आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या बांधायचा निर्णय घेतला व मोठ्या शिताफीने सापळा रचला.

     वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी गोपनीय बातमीदारांना कामाला लावले. सतत 15 दिवसांच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला रेमडीसीवीर इंजेक्शन गैरमार्गाने विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. नियोजित क्रमानुसार मुस्लीम लायब्ररी ते पोस्ट ऑफीस चौक मार्गावर पोलिस दबा धरून बसले. तात्काळ एका व्यक्तीस एक लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम देवुन 4 रेमडीसीवीर इंजेक्शनचा छुपा सौदा करण्यास सांगीतले. फोन वरुन सौदा पक्का झाल्यावर आरोपीनी नियोजीत ठिकाणी 4 रेमडीसीवीर इंजेक्शन देत असल्याचे सांगीतले. आरोपी इंजेक्शन डिलिव्हर करण्यास आला असता पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपी बबन मन्साराम बुधे, वय 35 वर्षे, रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा आणि सचिन अशोक हुमने, वय 29 वर्ष, रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा यास रेमडीसीवीर इंजेक्शनसह 4 ताब्यात घेतले.

     चौकशीदरम्यान त्यांनी इंजेक्शन दोन महिला नर्सकडून घेतल्याची कबुली दिली. तात्काळ दोन्ही महिलांच्या घरची झडती घेतली असता त्यांच्या घरुन मोठ्या प्रमाणात औषधींचा साठा हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपी महिलांनी गैरमार्गाने चोरून ज्यादादराने विकलेल्या औषाधांचे नगदी 90,000 रु., एक मोटार सायकल व तिन एंड्रॉईड मोबाईल असा एकुण 1,70,962 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बाबत दोन्ही आरोपी मुलीना विचारना केली असता सोबती अनीकेत रंभाड ढवळे, वय २१ वर्ष, रा. भंडारा याच्या मदतीने रेमडीसीवीर इंजेक्शनचा गोरखधंदा चालवत असल्याचे कबूल केले. या प्रकरणातील सर्व आरोपी तरुण असून यांचा मास्टरमाइंड कुणीतरी मोठा व्यक्ति असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात आणीबाणीसारखी परिस्थिति असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांमार्फत केले जात असून बडे अधिकारी सर्वच बाबींवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच या प्रकरणातिल मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या जातील अशी खात्रीलायक माहिती आहे.

     पोलीस स्टेशन भंडारा येथे पाचही आरोपीविरुद्ध भादवी च्या कलम 188, 420, 34, परिशिष्ट औषध नियंत्रण किंमत आदेश 2013, सहकलम, 3(2)(क), 7 जिवनावष्यक वस्तु अधिनियम 1955, सहकलम 18(क), 27(ख)(2), सौदर्य प्रसाधन कायदा 1999 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपासात सुरू आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे -शाखा भंडाराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, पो. उपनि. विवेक राऊत, सहायक फौजदार वामन ठाकरे, पोहवा. सुधिर मडामे, तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, गेंदलाल खैरे, नितीन शिवनकर, क्रिष्णा बोरकर, नंदकिशोर मारबते, अमोल खराबे, पंकज भित्रे, बबीता चैरे, उमेश्वरी नाहोकर, अन्न व औषध विभागाचे अधिकारी रामटेके यांच्यासह उत्तमरित्या पार पाडली.

आरोपी: 1. बबन मन्साराम बुधे, वय 35 वर्षे, रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा

2. सचिन अशोक हुमने, वय 29 वर्ष, रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा

3. अनीकेत रंभाड ढवळे, वय २१ वर्ष, रा. भंडारा

4. महिला नर्स 

5 . महिला नर्स 

वाचा पुढील बातमी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या ह्याच त्या नर्स http://newskatta.in/article/449

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links