BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

113 Views

By न्यूज कट्टा


लोहारा 

राजीनामा अन पैसेही द्या 

राजीनामा अन पैसेही द्या  !
संस्था चालकाची  चक्क मुख्याध्यापकाला मारहाण 

न्यूज कट्टा / लोहारा 

स्वतःच्या सुनेला मुख्याध्यापकपदी रुजू करायचे असल्याने संस्था चालकाने  शाळेच्या मुख्याध्यापकाला  राजीनामा देण्यासाठी धमकावून  चांगलीच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार  तुमसर तालुक्यातील लोहारा टोली जवळ घडली. या प्रकरणी पाच जणांवर आंधळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ  महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिवनारायण राणे हे  नेहमीप्रमाणे शाळेत आले होते. घटनेच्या दिवशी मुख्याध्यापक कार्यालयाचा  जुना  कुलूप काढून नवीन कुलूप लावण्यात आला होता. जुना कुलूप तोडून नवीन कुलूप संस्था चालक कन्हयालाल टेंभरे यांनी लावल्याचे परिचर आर. एस. राऊत यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. यावेळी संस्था चालक कन्हयालाल टेंभरे यांची तीन मुले सोबत होती. मुख्याध्यापक राणे यांनी शिक्षकांचे हजेरी पत्रक घेतले. मुख्याध्यापक राणे यांनी कार्यालयाला कुलूप ठोकल्याचा फोटो मोबाईल मध्ये  घेतला .  शालेय कामे आटोपून मुख्याध्यापक आपल्या चारचाकी वाहनाने शालेय अनुदान मूल्यांकन माहिती घेवून  तुमसरकडे जात होते.  दुपारी 1.30 च्या सुमारास  लोहारा टोली जवळ दोन गाड्यातून  कन्हयालाल टेंभरे  आणि त्यांचे तीन मुले चंद्रसेन टेंभरे,टेकचंद टेंभरे, हेमंत टेंभरे व देवीलाल चौधरी तसेच एक अनोळखी इसमाने मुख्याध्यापक राणे यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. त्यांना बाहेर ओढले.' माझ्या सुनेला मुख्याध्यापक बनवायचे आहे. तुला राजीनामा द्यावा लागेल. मला खर्चासाठी पैसे दिले नाही तर तुला जीवे मारू' अशी धमकी देत चप्पल,  थापड व बुक्क्यांनी मारहाण करीत मुख्याध्यापक राणे यांना जमिनीवर पाडले . 
 चंद्रसेन टेंभरे, टेकचंद टेंभरे यांनी राणे यांच्यावर चाकूने वार केले . मनगट व दोन्ही हाताला जखमी केली. टेकचंद टेंभरे यांनी बुक्की मारल्याने मुख्याध्यापक राणे यांचा एक दात पडला. भांडण सोडविण्याच्या झटापटीत मुख्याध्यापक राणे यांच्या मुलाला दोन्ही हातावर चाकूची जखम झाली . घटनेनंतर सर्व आरोपी शाळेत गेले. संस्था चालक कनैयालाल टेंभरे ,चंद्रसेन टेंभरे, टेकचंद टेंभरे, हेमंत टेंभरे व देवीलाल चौधरी तसेच एक अनोळखी इसमाविरुद्ध आंधळगाव पोलिसांनी कलम 143, 147, 324, 325, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links