BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

862 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नागपूर

विद्यापीठ, महाविद्यालयस्तरावरील परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या

विद्यापीठ, महाविद्यालयस्तरावरील परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या
-    कोरोनामुळे कुलगुरूंचा निर्णय; प्राचार्य फोरमच्या मागणीला यश

न्यूज कट्टा 
नागपूर, ता. 8: कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या दहशतीने सर्वत्र थैमान घातले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 5 ते 20 मे दरम्यान ऑनलाईन परीक्षांचा अट्टहास धरला. त्यामुळे एका विद्यार्थीनीला चक्क अतिदक्षता वार्डातून परीक्षा द्यावी लागली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला. त्याचे पडसाद पडताच आज विद्यापीठाने एका महिन्यासाठी अंतिम वर्ष वगळता विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावरीत सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

     विद्यापीठाच्या पदव्युत्तर एम.ए., एम.एसस्सी. आणि एम.कॉम. च्या प्रथम सत्राच्या परीक्षा 5 ते 20 मे दरम्यान महाविद्यालयस्तरावर घ्याव्या अशा सूचना देण्यात आल्यात. यानुसार विविध महाविद्यालयांकडून आजपासून परीक्षा घेण्यास सुरूवात झाली. विदर्भात कोरोना बाधीतांती संख्या वाढली असून त्यामुळे प्रत्येक कुटुंबात बाधीतांचा समावेश असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक प्राध्यापक, महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याने अशा भयावह परिस्थितीमध्ये परीक्षा घेऊ नये, किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासाठी आग्रह करू नये अशी मागणी प्राचार्य संघटनांकडून करण्यात आली. यावर ऑनलाइन परीक्षा असल्याने त्या घेण्यास अडचण नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोरोनाग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुटल्यास मग परीक्षा कशी होईल अशी समस्या समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे कशाही अवस्थेत परीक्षा द्यायची यामुळे परीक्षेचे टेन्शन घेत, परीक्षा देण्याचे ठरविले. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी सामान्य वार्डात असलेली एम.टेक.ची मुलगी अतिदक्षता (आयसीयू) वार्डात दाखल झाली. मात्र, परीक्षा द्यायची असल्याने तीने याही अवस्थेत परीक्षा दिली. केवळ तीने एकटीनेच नव्हे तर बऱ्याच कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिल्यात. या प्रकाराने समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे, याविरोधात ‘द प्लॅटफॉर्म’ आणि मानव अधिकार संरक्षण मंचाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करीत तात्काळ परीक्षा रद्द करावी व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्राधीकरणाच्या सदस्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने शेवटी विद्यापीठाने नमते घेत, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा अर्ज भरण्याचीही मुदत वाढणार
विद्यापीठाद्वारे कोरोना काळात १५ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रथम वर्षांचा परीक्षा न होता कसे काय? दुसऱ्या सेमिस्टरचे अर्ज भरायचे असा तिढा निर्माण झाला. ही बाब ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.जी.भोयर यांनी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता परीक्षा अर्ज करण्याचा तारखेतही वाढ होणार आहे.


“कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेणे सध्यातरी शक्य नाही. याबाबत महाविद्यालयांची मागणी होती. त्याअनुषंगाने परीक्षा एका महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहे.”
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links