BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1030 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


सोलापूर

अखेर ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना ट्रॉफी घरपोच

अखेर ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना ट्रॉफी घरपोच

 

न्यूज कट्टा ब्यूरो 

सोलापूर, दि. 11: जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चे ग्लोबल टीचर ऍवार्ड विजेते व सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना अखेर मंगळवारी ग्लोबल टीचर ट्रॉफी घरपोच मिळाली. ट्रॉफी घरपोच मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींनी ट्रॉफीचे चुंबन घेऊन स्वागत करत आनंद व्यक्त केला.

     विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्‍यूआर कोडच्या साहाय्याने शिक्षण देण्यासाठी डिसले गुरुजी प्रसिद्ध आहेत. कोविड महामारीमुळे गुरुजींना ग्लोबल टीचर्स ऍवार्ड सोहळ्याला उपस्थित राहता आलेले नव्हते. त्यामुळे आता त्यांना ट्रॉफी घरपोच मिळाली आहे. गुरुजींनी इतर शिक्षकांनासुद्धा टेक्‍नोसॅवी होण्यासाठी प्रेरित केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळासुद्धा उभारली आहे. कल्पकता आणि संशोधनात्मक वृत्तीच्या जोरावर गुरुजींनी ग्लोबल टीचर ऍवार्ड मिळविला आहे.

     डिसले गुरुजींनी लॉकडाऊनमध्येसुद्धा तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकविले आहे. पाठ्यपुस्तकाला प्रत्येक धड्याला एक स्वतंत्र क्‍यूआर किंवा क्विक रिस्पॉन्स कोड दिल्यामुळे कोणालाही शाळेबाहेर कुठेही आणि केव्हाही तो धडा श्राव्य किंवा दृक-श्राव्य माध्यमातून समजून घेणे सोपे झाले आहे. डिसले गुरुजींनी तयार केलेली क्‍यूआर कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करत आहेत.

     ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. कार्लो मझोने- रणजितसिंह डिसले स्कॉलरशिप ‘या नावाने 400 युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहे. विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यासाठी संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजींनी मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील 7 कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडेतीन कोटींची रक्कम 9 देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझोने हे त्यापैकीच एक आहेत.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links