BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

645 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

म्युकर मायकॉसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - ना. राजेश टोपे

म्युकर मायकॉसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - ना. राजेश टोपे

न्यूज कट्टा / भंडारा, १२ मे 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकॉसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या  आजाराबाबतच्या जागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकॉसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली आहे.

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकर मायकॉसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.  नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. या आजारावर लवकर उपचार न केल्यास श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या आजारावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही श्री. टोपे यांनी सांगितले. म्युकर मायकॉसीस आजारावरील इंजेक्शन्सची चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही श्री. टोपे म्हणाले. मधुमेह असलेल्या रुग्णांनी घाबरून न जाता तो नियंत्रीत ठेवावा, त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links