BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1422 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

आनंद वार्ता ... दोन महिन्यानंतर जिल्ह्यात मृत्यू संख्या शून्य

आनंद वार्ता ... दोन महिन्यानंतर जिल्ह्यात मृत्यू संख्या शून्य
 

न्यूज  कट्टा / भंडारा, २१ मे 

तब्बल दोन महिन्यांनंतर आज जिल्हा वासियांसाठी आनंद वार्ता आहे. जिल्ह्यात आज 211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दोन महिन्यानंतर दैनिक मृत्यू संख्या शून्यावर आली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55364 झाली असून आज 84 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57800 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.79 टक्के आहे.


आज 1421 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 84 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 73 हजार 988 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 57800 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील 20, मोहाडी 03, तुमसर 04, पवनी 13, लाखनी 21, साकोली 17 व लाखांदुर तालुक्यातील 06 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 55364 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 57800 झाली असून 1398 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1038 झाली आहे.

 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.79 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.79 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links