BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1128 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

 लाखांदूर साखर कारखानाला ७ वर्षापासून टाळे

 लाखांदूर साखर कारखानाला ७ वर्षापासून टाळे
 

अभिमन ठाकरे
 

न्यूज कट्टा/ लाखांदूर, २२ मे 

बेरोजगार युवक  व शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणण्यासाठी खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या पुढाकाराने लाखांदूरात ‌ नँचरल  ग्रोवर्स हा साखर कारखाना उभारण्यात आला . परंतु जेमतेम तीन वर्षातच कारखान्याला कुलूप लागले आहे .आजतागायत हा साखर कारखाना बंद असून या रूपाने सुरू झालेल्या औद्योगिक विकासाच्या उमेदीलाही खीळ बसला आहे .

शेतकऱ्याच्या सर्वागीण विकास व्हावा . बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी तत्कालीन अवजड उद्योगमंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने लाखांदूर येथे एमआयडीसीच्या जागेत नॅचरल  ग्रोवर्स साखर कारखाना उभारण्यात आला . मात्र प्रफुल पटेल यांच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि साखर कारखान्याला कुलूप लागले. हा बंद कारखाना सध्या भंगारात गेला आहे .

२०११ मध्ये तत्कालीन अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने साकोली - वडसा मार्गावरील एमआयडीसीच्या जागेत नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले . अवघ्या १ वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण झाले. २०१२ मध्ये मोठ्या थाटात उत्सवात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाटन झाले . लाखांदूर तालुक्यात खूप कमी शेतकरी ऊस उत्पादन घेऊन देव्हाडा व बेला या साखर कारखान्यात पाठवीत होते . मात्र लाखांदूर तालुका स्तरावर कारखान्याची निर्मिती झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या शेतकऱ्यांनी भरघोस ऊस  उत्पादन घेण्यास सुरुवात केली. साखर कारखान्याची गाळप क्षमता ७ हजार टन होती. रेणुका शुगर कंपनीला कारखाना लीजवर देण्यात आला होता. ३ वर्ष हा कारखाना सुरळीतरीत्या सुरू असताना प्रफुल पटेल यांच्या   पराभवाचे निमित्त कारणीभुत होऊन कारखाना बंद पडला .

 शेतकरी बेरोजगारांना गाजर .. 
शेतकऱ्यांना नगदी पीक बेरोजगारांना रोजगारांचे गाजर दाखवून सुरु केलेला साखर कारखाना बंद पाडण्यात आला. त्यामुळे या सर्वांचा भ्रमनिरास झाला . या कारखान्यामुळे आणखी कृषी पूरक उद्योग धंदे येतील . औद्योगिक विकास होईल अशी अपेक्षा होती . पण ती फोल ठरली आहे . राज्यात सध्या महा आघाडीचे सरकार सत्तेत आहे व आपल्याच साकोली विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links