BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1506 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

पालगाव येथे प्लॅस्टिक कंपनीमध्ये भीषण आग..... लाखो रुपयांची प्लॅस्टिक जळून खाक

पालगाव येथे प्लॅस्टिक कंपनीमध्ये भीषण आग

लाखो रुपयांची प्लॅस्टिक जळून खाक

न्यूज कट्टा / भंडारा, २५  मे 

भंडारा- पवनी मार्गांवरील पालगाव येथील उमा प्लास्टिक कंपनीला आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे, आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा उंच उठत असुन आगीमुळे सर्वत्र धुर पसरला आहे.

भंडारा जिल्ह्यातील भंडारा- पवनी मार्गांवर पालगाव येथे उमा प्लास्टिक कंपनी अनेक वर्षापासून आहे. सकाळी अचानक या कंपनीला आग लागली. या आगीत कंपनी परिसरातील वेस्ट प्लास्टिक पूर्णतः जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५ तासांपासून अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरु आहेत. प्लास्टिक कंपनीमध्ये आग लागल्याने लाखों रूपयांचा प्लॅस्टिक जळून राख  झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links