BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

701 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

विद्यार्थी व शिक्षक यांना व्हॅक्सिन दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत

विद्यार्थी व शिक्षक यांना व्हॅक्सिन दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत

आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र 

 न्यूज कट्टा / भंडारा,  26 मे 

विद्यार्थी व शिक्षक यांना व्हॅक्सिन दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत अशी स्पष्ट मागणी आमदार कपिल पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि शिक्षणमंत्री  वर्षा  गायकवाड यांना पत्र लिहून केली आहे.    

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करून त्यांना व्हॅक्सिन देण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने करत येत आहे. परंतु शासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक शिक्षक, कर्मचारी यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्यक्ष कोविड ड्युटी करत असताना 150 हून अधिक शिक्षक व कर्मचारी यांचे बळी गेले. तर कोविडची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांची संख्या एक हजाराहून जास्त आहे, असे मत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केले आहे.   

भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारकडे शिक्षकांचा फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये समावेश करून व्हॅक्सिन देण्याची मागणी केली होती. तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन (WHO) च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शिक्षकांचा फ्रंटलाईन वर्कर्स मध्ये समावेश करून व्हॅक्सिन देण्याबाबत सूचना केली आहे. मात्र अद्यापही शासन याबाबत निर्णय घेत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. आणि अशा काळात जर व्हॅक्सिन शिवाय परीक्षा घेतल्या तर आपण लहानग्या विद्यार्थ्यांना कोविडच्या संसर्गात कारण नसताना लोटणार आहोत, असंही कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.अशी माहिती शिक्षक भारती नागपूर  विभागाचे सरचिटणीस प्रा .सपन नेहरोत्रा यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links