BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1471 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

सेवा संस्था भागविताहे नागझिरा-नवेगांव कॉरीडोरमधील वन्यप्राण्यांची तहान 

सेवा संस्था भागविताहे नागझिरा-नवेगांव कॉरीडोरमधील वन्यप्राण्यांची तहान 

 जांभळी ब्लॉकमध्ये पाणवठ्यांची व्यवस्था 

न्यूज कट्टा / भंडारा, ३१ मे 

रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांची तहान  “सेवा संस्थेतर्फे" भागविली जात आहे. संस्थेच्या पुढाकाराने नागझिरा-नवेगांव कॉरीडोरमधील जांभळी ब्लॉकमध्ये वन्यप्राण्यांकरिता पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले असून मागील ५ वर्षांपासून ही संस्था 'वॉटर मॅनेजमेन्ट'चे काम नागझिरा-नवेगांव कॉरीडोरमधील जांभळी ब्लॉकमध्ये करीत आहे. 

 गेल्या दशकापासुन "सेवा संस्था” वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. विशेषतः नागझिरा-नवेगांव व्याघ्रप्रकल्पलगत बफर व कॉरीडोरमध्ये कार्य करीत आहे. नागझिरा-नवेगांव कॉरीडोरमधील १३ गावांमध्ये व परिसरात सेवा संस्था लोकसहभागातुन वन्यजीव संरक्षणाचे कार्य करीत आहे, त्यामध्ये जांभळी ब्लॉक हे संस्थेचे कार्यक्षेत्र असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकर यांनी सांगितले. 

जल स्रोताचे पुनरुज्जीकरण
सध्या पाण्याची अडचण बघता संस्थेमार्फत  टँकरद्वारे वन्यप्राण्यांकरिता पाण्याचा पुरवठा करणे सुरु आहे. आययुसीएन प्रोजेक्टमधून पावसाळ्यानंतर नैसर्गिकरित्या वाहणारे झरे तसेच नाले यांचे सिल्ट (गाळ) काढून छोटे बंधारे बनवून स्रोताचे पुनरुज्जीकरण करण्यात आले आहेत . 

विदर्भातील व्याघ्रक्षेत्रात वॉटर मॅनेजमेन्ट
जांभळी ब्लॉकमध्ये एफ. डी. सी. एम. चे जांभळी १, जांभळी २ वनपरीक्षेत्र लागले आहे, तसेच प्रादेशिक वनविभागाचे सडक अर्जुनी, उत्तर देवरी, गोरेगाव हे वनपरिक्षेत्र (रेंज) लागलेले आहे. सेवा संस्था IUCN प्रोजेक्ट अंतर्गत विदर्भातील व्याघ्रक्षेत्राचे एकात्मिक संगोपन आणि परिस्थितिकीय विकास (Integrated Tiger Habitat Conservation Programme) या कार्यक्रमातून वॉटर मॅनेजमेन्टचे कार्य संस्था करीत आहे.

 

पाण्याची पातळी व साठा वाढवण्याचे कार्य

संबधित विभागाकडुन कायदेशीर परवानगी घेऊन संस्था कार्य करीत आहे ज्यामध्ये जंगलातील नैसर्गिक पाण्याचे झरे त्यावर जमा झालेले गाळ (सिल्ट) वेळोवेळी साफ करणे, त्यात पाण्याच्या स्रोतांच्या नसांना दगा/इजा न पोहचवता कार्य करणे याची खबरदारी घेणे आवश्यक असते. नैसर्गिक स्रोत नाल्यामध्ये असल्यास त्यांच्या वरती व खालती कच्चे मातीचे व रेतीचे बंधारे बनवुन त्या भागातील पाण्याची पातळी व साठा वाढवण्याकरीता कार्य करण्यात आले.  

उन्हाळ्यातही भागते वन्यप्राण्यांची तहान 

पावसाळ्यानंतर (मान्सूननंतर) पोस्ट मान्सून बंडस (कच्चे बंधारे) वरपासून खालपर्यंत ४-५ ठिकाणी वाहत्या नाल्यात तयार करण्यात आले, त्यामुळे त्या ठिकाणातील पाण्याची पातळी व साठा वाढले हे निदर्शनात आले.  ठरविलेले मजुर पाण्यांच्या स्तोत्रांवरील गाळ, कचरा काढुन पाणी वन्यप्राण्यांना पिण्यायोग्य ठेवण्याचे कार्य करतात.या सर्व कामामुळे नैसर्गिक पाण्याचे झरे, स्रोत जे आधी फेब्रुवारी पर्यंतच चालायचे ते आता मे-जून महिन्यापर्यंत प्राण्यांची तहान भागवत आहेत. सदर कार्यक्रम ३१ मार्च २०२१ पर्यंत असल्याने संपुष्टात आले आहे अशी माहिती सावन बहेकार यांनी दिली.

टँकरद्वारे पाणी पुरवठा व पाणवठ्यावर निगराणी

उन्हाळ्याची दाहकता व पाण्याची कमतरता बघून संस्थेतर्फे स्व: खर्चातून प्राण्यांकरिता टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जंगलामधील भाग खूप मोठा तसेच मोठ्या प्रमाणात वन्यजीव ह्या भागात असल्याने उपलब्ध पाण्याचे स्तोत्र कमी पडतो त्यामुळे  संस्थेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. संस्थेच्या टिमद्वारे पाणवठ्यावर निगराणी सुद्धा ठेवण्यात येते. तसेच वेळोवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात येते, कुठे पाणवठ्यावर पाणी नसल्यास पाणवठ्यावर कोणी विषप्रयोग केल्याचे निदर्शनात आल्यास (लिटमस टेस्ट ) द्वारे शोध घेऊन लगेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येते. सदर कार्यक्रमास वनविभागाकडून पण प्रतिसाद व साथ मिळत आहे त्यामध्ये प्रादेशिक व एफ डी सी एम यांचे सहकार्य मिळत आहे .

सावन बहेकर , अध्यक्ष , सेवा संस्था 

सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसनी, शशांक लाडेकर, अंकित ठाकूर, कन्हैया उदापुरे, दुष्यन्त आकरे, अविजीत परिहार यांचे अथक प्रयत्न आणि परिश्रमाने हे कार्य सुरु आहे. तसेच स्थानिक पातळीवर हवन लटाये, नरेश मेंढे, विजय सोनवणे, संतोष कोरे, बादल मटाले यांचे देखील मोलाचे सहकार्य आहे.

गौर/गवा यांचे उष्माघाताने होणारे मृत्यू
जांभळी भागामधे वन्यप्राण्यांच्या अनुषंगाने जैवविविधता उत्तम आहे, त्यात गव्यांची संख्या चांगली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे व उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी होणाऱ्या जलस्त्रोतांमुळे वन्यप्राण्यांची पाण्याकरीता मोठ्या प्रमाणात पायपीट व्हायची , त्यातुन उष्माघाताने पाण्याचा अभावी  गव्यांचा मोठ्याप्रमाणात मृत्यू होत होता. वन विभाग आपल्या स्थरावर कार्य करित आहे पण पाण्याची होणारी अडचण बघता सेवा संस्था गेल्या ५ वर्षांपासून कार्य करीत असल्याची माहिती बहेकर यांनी दिली.

 नागझिरा-नवेगांव कॉरीडोर वन्यप्राण्यांचे माहेर घर

पाण्याची व्यवस्था करताना ७ नैसर्गिक झऱ्याचे, ८ कच्चे बंधारे, १ टाका यांचे निर्मिती व पुन्ररुज्जीकरण करण्यात आलेले असून ४-५ स्थळी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  हा जंगली भाग अनेक वन्यप्राण्यांचे माहेर घर आहे.  संनियंत्रण करताना मोठ्या प्रमाणात वन्यजीव या भागात आश्रयास आहेत. काही दुर्मिळ व महत्वाच्या प्रजातीही समाविष्ट आहेत, ज्यात वाघ,  बिबट, अस्वल ,गवे , रानकुत्रे , चांदि अस्वल (रॅटल) , चितळ, Rusty spotted kar, भेकड Barking deer, चौसिंगा, निलगाय(bluebull) , रानटी डुक्कर इत्यादी तसेच अनेक महत्त्वाचे पक्षी व सरपटणारे प्राणी सुद्धा  ह्या भागात पहावयास मिळतात. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links