BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1121 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

भंडारा जिल्हा समन्वयक पदी शैलेश रामटेके, पंधरे व पारस कुमार भुसारी 

भंडारा जिल्हा समन्वयक पदी शैलेश रामटेके, पंधरे व पारस कुमार भुसारी 

न्यूज कट्टा / लाखांदूर, ३१ मे  

विदर्भ विभागीय भंडारा जिल्हा समन्वयक पदी शैलेश रामटेके . एस .जी . पंधरे  व पारस कुमार भुसारी यांची राज्य परिषदेने केली यांची निवड केली आहे. सक्षम ग्रामपंचायती व सरपंच यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र परिवारात ग्राम विकास व कोरोना काळात उत्कृष्ट कार्यासाठी ही निवड राज्य परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या परवानगीने झूम मीटिंगमध्ये सर्वानुमते करण्यात आली आहे.

विदर्भातील तज्ञ, सरपंच, ग्रामपंच - अधिनियमाचे अभ्यासक व मुत्सद्दी विविध पुरस्कार प्राप्त सरपंच साकोली तालुक्यातून सुरेश पंधरे, सरपंच वडेगाव, लाखांदूर मधून शैलेश रामटेके, सरपंच  पुयार तर तुमसर तालुक्यामधून पारस कुमार भुसारी, सरपंच ब्राह्मण टोला यांची ३० मे रोजी राज्य कार्यकारिणीने जिल्हा समन्वयक म्हणून निवड केली आहे. पदभार देऊन जिल्ह्यात सभासद वाढवण्यासाठी तसेच समस्या व अन्यायाला वाचा फोडण्यास जिल्हा स्तरावर कामाची संधी देण्यात आल्याचे सांगितले.  जिल्हा समन्वयक सरपंच म्हणून महा . सरपंच परिषद मुंबईचे अध्यक्ष दत्ता काकडे . महा . उपाध्यक्ष अनिल गीते, सरचिटणीस  ॲड .गणेश जाधव , राज्य महिला अध्यक्षा राणी ताई पाटील यांच्या संयुक्त सहिने नियुक्ती पत्र व अभिनंदन पत्र  देवून सन्मानित केले

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links