BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2262 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

उद्यापासून पुन्हा १५ दिवसांचा लॉक डाऊन, जिल्ह्यात निर्बंध शिथिल

उद्यापासून पुन्हा १५ दिवसांचा लॉक डाऊन, जिल्ह्यात निर्बंध शिथिल

नियमावलीत काय काय बदल झाले ?

- अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत
- शनिवार, रविवार पूर्ण बंद
- केशकर्तनालयाला कुलूपच

न्यूज कट्टा / भंडारा / ३१ मे 

भंडारा जिल्ह्याला लॉक डाऊनचा फायदा झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्याचा कोरोना सकारात्मकता दर ७.७  टक्के असून 18.18 टक्के प्राणवायूचा खाटा भरलेल्या असल्याने  जिल्ह्याला लॉक डाऊनच्या नियमावलीतून काही प्रमाणात मुभा मिळाली आहे. आता अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असून शनिवारी आणि रविवारी मात्र ती पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. इतर सेवा सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला नसून केशकर्तनालयाचे कुलूप 15 जून पर्यंत बंदच राहणार आहे. 
 

रुग्ण सकारात्मकतेचा दर 7.7 टक्के

लॉक डाऊन15 जून पर्यंत करण्यात आल्यानंतर ज्या जिल्ह्याचा रुग्ण सकारात्मकतेचा दर दहा टक्क्यांच्या आत आणि 40% च्या प्राणवायूच्या खाटा भरलेल्या असतील अशा जिल्ह्यांना काही प्रमाणात मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.  स्थानिक स्तरावर जिल्हाधिकार्‍यांना मुभा देण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार 1 ते 15 जून पर्यंत असलेल्या लॉक डाऊन दरम्यान काही अंशी जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रुग्ण सकारात्मकतेचा दर 7.7 टक्के असून 18.18 टक्के प्राणवायूचा खाटा भरलेल्या असल्याने ही मुभा मिळण्यासाठी जिल्हा पात्र ठरला आहे.
  

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवेची दुकानेही पूर्णपणे बंद

आतापर्यंत सकाळी 7 ते 11 असे अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसाठी असलेले निर्बंध हटवून ही वेळ 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू असतील. नंतर मात्र सर्व प्रतिबंध लागू राहणार आहेत. यातून वैद्यकीय व अति आवश्यक सेवा वगळण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवेची दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.


काही निर्बंध पूर्वीप्रमाणेच
पंधरा दिवसाच्या लॉक डाऊनदरम्यान पूर्वीप्रमाणेच सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रम, मोर्चे, धरणे आंदोलन, मेळावे आणि रॅली यावर बंदी राहणार आहे. कृषी विषयक साहित्याची दुकाने मात्र सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत राहणार असली तरी त्यांनाही शनिवार आणि रविवारी बंदचे नियम पाळावे लागणार आहेत.  

लहान व्यावसायिकांमध्ये संताप मात्र कायम
केशकर्तनालयाच्या यासंदर्भात अनेकांना सकारात्मक अपेक्षा होती. परंतु ती उघडण्यास संदर्भात कोणताही निर्णय न झाल्याने 15 तारखेपर्यंत पुन्हा केशकर्तनालयाला कुलूप राहणार आहे. हॉटेल खानावळ या ठिकाणाहून केवळ पार्सलची सुविधा उपलब्ध होणार आहे. चष्म्याची दुकाने मात्र सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात यात निर्देशित करण्यात आले आहे. लॉक डाऊनमध्ये  शिथिलता आली असली तरीआली असली तरी लहान व्यवसायिकांच्या संदर्भात यात काहीही निर्णय न झाल्याने अशा व्यावसायिकांमध्ये संताप मात्र कायम आहे.

1) भंडारा जिल्हयातील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने ही सकाळी 07.00 ते दुपारी 2.00 दरम्यान सुरु राहतील.
2) सर्व अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने (एकेरी) शॉपींग कॉमप्लेक्स मधील दुकाने वगळून व खालील नमुद प्रतिबंधित बाबी मधील दुकाने वगळून ही सकाळी 07.00 ते 2.00 पर्यंत सुरु राहतील. सदर दुकान
शुक्रवार दुपारी 2.00 पासून ते सोमवार सकाळी 07.00 पर्यंत (शनिवार व रविवार) पुर्णत: बंद राहतील.
 सदर दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रीसुत्रीचा वापर करणे अनिवार्य राहिल.
3) सर्व प्रकारच्या सामानांची घरपोच सेवा सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत सुरु राहील.
4) दुपारी 3.00 वाजेनंतर जिल्हयातील सर्व प्रकारच्या हालचालींना प्रतिबंधित करण्यात येत आहे. (वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कामे / घरपोच सेवा सहित सदरचे कामांना मुभा राहिल.)
5) जिल्हयातील सर्व शासकिय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळता) ही 25% उपस्थितीत सुरु राहतील. तथापी एखादी कार्यालय जास्त उपस्थिती ठेवू इच्छित असेल तर जिल्हाधिकारी यांचे परवानगी घेणे अनिवार्य असेल.
6) कृषी विषयक सर्व बाबींची साहित्यांची सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं. 05.00 पर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पुर्णत: बंद राहतील

• प्रतिबंधित बाबी.
१ ) सर्व बगीचे, सार्वजनिक मैदाने हे बंद राहतील.
२ ) सर्व सिनेमागृह बंद राहतील
३ ) सर्व नाट्यगृह, ऑडीटोरीयम बंद राहतील
४ ) अम्युस्मेंट पार्क/विडियो गेम पार्लर बंद राहतील.
५ ) आठवडी बाजार बंद राहतील.
६ ) जलतरण केंद्र, व्यायामशाळा, स्पोर्ट कॉम्लॅक्स बंद राहतील.
७ ) सर्व उपहारगृहे, होटेल व बार हे बंद राहतील. पार्सल सुविधा, होम डिलिवरी सुविधा सुरू राहतील.
८ ) ज्या हॉटेल मध्ये, रेस्टॉरंट मध्ये निवासी व्यवस्था आहे, तेथील निवासी अतिथींकरीता रेस्टॉरंट सुरू ठेवता येईल. परंतू सदर दरम्यान बाहेरील व्यक्तिना रेस्टॉरंट मध्ये मज्जाव असेल.
९ ) धार्मिक स्थळे बंद राहतील
१० ) नियमित होणाऱ्या विधी, पुजा व इतर धार्मिक स्थळावरील कार्यरत पुजारी, मौलाना, इ. करता येतील. परंतू सदर दरम्यान बाहेरील व्यक्तिंना प्रवेश मज्जाव असेल.
११ ) धार्मिक स्थळावर काम करणारे पुजारी, मौलाना, कर्मचारी इ. यांनी भारत सरकारव्दारे निगम धोरणानुसार तात्काळ कोविड लसीकरण करुन घ्यावे.
१२ ) हेअर सलून/स्पा/ब्युटी पार्लर बंद राहतील

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links