BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1646 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

...आणि स्मशानभूमीही रडू लागली... अवघ्या नऊ तासात एकाच कुटुंबातील तीन मृतदेहांना मुखाग्नी 

...आणि स्मशानभूमीही रडू लागली... अवघ्या नऊ तासात एकाच कुटुंबातील तीन मृतदेहांना मुखाग्नी 

 
न्यूज कट्टा / भंडारा, २ जून 

सध्या कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत असला तरी या कोरोनामुळे कित्येक कुटूंब उध्वस्त झाले आहेत,  कित्येक कुटूंब अनाथ झाल्याच्या घटना आहेत. अशीच दुदैवीआणि हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील माटोरा गावात घडली आहे. बोरकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू एकाच दिवशी तीन-तीन तासांच्या अंतराने झाला. कोरोनाने एकाच कुटूंबातील तिघांना काही क्षणात गिळंकृत केले. अवघ्या नऊ तासात आई, वडील आणि पाठोपाठ मुलगा अशा तीन मृतदेहांना मुखाग्नी देण्यात आला .  या तीन धगधगत्या मृतदेहांना बघून मोटोरावासियांसह स्मशानभूमीही रडू लागली.

या वर्षी कोरोनाने अक्षरशः थैमान घातला. अनेकांनी आपला जीव गमावला तर अनेकांनी त्यांचे जिवलग. काहींनी त्यांची तरणीताठी पोर गमवली तर काही लहान  मूल अनाथ झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुलबाळ रस्त्यावर आलीत. साठवून ठेवलेला पैसा देखील अनेकांच्या कामी आला नाही. कोरोनारूपी या राक्षसाची भूक अजूनही भागलेली नाही. आता अत्यंत क्रूरपणे त्याने बोरकर कुटुंबितील तिघांना आपले भक्ष केले होते. 

माटोरा ग्रामपंचायतीने गावात कोरोना चाचणी शिबीर लावले होते . शिबिरात चाचणी करण्यास आलेले सेवानिवृत्त शिक्षक महादेव बोरकर(८०) व त्यांची पत्नी पार्वता बोरकर(७०) हे दोघेही कोरोना बाधित आढळले.  त्यानंतर त्यांचा मुलगा विनायक बोरकर(५०) यानेही त्याची चाचणी करून घेतली, त्यात तो सुध्दा कोरोनाग्रस्त  असल्याचे निदर्शनास आले. महादेव व पत्नी पार्वताबाई आणि मुलगा विनोद बोरकर यांनी घरी उपचार सुरु केले.  मात्र दुसऱ्या दिवशी अचानक महादेव बोरकर यांची प्रकृती खालावली आणि दुपारच्या सुमारास एकाएकी महादेव यांची प्राणज्योत मालवली. गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून बोरकर कुटुंबीय घरी परतले. पार्वताबाई यांना हा धक्का सहन झाला नाही आणि अवघ्या तीन तासातच त्यांनीही प्राण त्यागले. जड अंतकरणाने पुन्हा स्मशानभूमीच्या दिशेने दुसरे पार्थिव जावू लागले .. महादेव यांची राख अजून शांत व्हायचीच होती, आता  त्यांच्या शेजारीच पार्वताबाईच्या पार्थिवाला अग्नी दिली गेली. 

आई-वडीलांच्या अशा एकाएकी जाण्याने विनायक काहीसे खचले.  स्वतःला सावरण्या आधीच त्याचीही प्रकृती बिघडली. अचानक आँक्सिजन लेवल कमी झाली.  विनायक याना उपचारासाठी भंडारा इथे आणत असतांना रस्त्यातच कोरोनाने त्यांच्यावरही झडप घातली... अजुनही स्मशानभूमीत धगधगत होती. महादेव आणि पार्वताबाईच्या मृतदेह धगधगत्या मृतदेहाजवळ त्यांच्या लेकालाही मुखाग्नी देताना  आता स्मशानभूमीही रडू लागली. अवघ्या काही तासातच वडील,आई आणि पाठोपाठ मुलाचा असा करूण अंत झाल्याने बोरकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. बोरकर कुटुंब कसं बसं यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे, पण कोरोनाने त्यांच्या कुटुंबाला दिलेले हे घाव आयुष्यभर त्यांना बोचत राहतील. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links