BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3893 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

लाजिरवाणा प्रकार.... भर रस्त्यात महिला पदाधिकारी व अधिकारी एकमेकींच्या झिंज्या उपटतात तेव्हा ...!!!

लाजिरवाणा प्रकार....

भर रस्त्यात महिला पदाधिकारी व अधिकारी एकमेकींच्या झिंज्या उपटतात तेव्हा ...!!!

ग्रामसेवक व सरपंच यांच्यात फ्री स्टाईल मारहाणीचा  व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल 

न्यूज कट्टा / भंडारा, ६ जून 

एक महिला अधिकारी आणि पदधिकारी भर रस्त्यात एकमेकींच्या झिंज्या  उपटत असतानाचा एक व्हिडीओ आज दिवसभर चर्चेचा विषय बनला. हो,  भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव ग्राम पंचायत येथे महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात फ्री स्टाईल मारहाण झाली असून सध्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, आज शिवस्वराज्य दिन असल्याने तुमसर तालुक्यातील सिलेगाव ग्राम पंचायत येथे कार्यक्रम घेण्यात आला. थोड्याच वेळात घरकुल ठरावाची प्रोसीडिंग कॉपी मागण्या वरुन महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यात सरपंच संध्या पारधी या  ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकविण्यासाठी जात असता वाद विकोपाला गेला.  

महिला सरपंच संध्या पारधी  यांनी ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्या जवळील प्रोसिडिंग घेऊन जात असताना ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी सरपंच यांना अडविण्याचा प्रयत्नही केला. यावेळी ग्राम पंचायत महिला सदस्य महिला मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात धक्काबुकी होत त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. महिला सरपंच, सदस्य यांनी ग्रामसेविकाला मारहाण केली.

ही  फ्रीस्टाईल मारहाण काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केली आहे. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी सिहोरा पोलिसात एका दुसऱ्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा तपास करीत आहे.

सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य आणि  ग्रामसेविका यांच्याविरुध्द अदाखपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून ग्रामसेविका सहारे यांच्या तक्रारीवरून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात भादविंच्या कलम ३२३, ५०४,५०६, ३४ सह अट्रॉसिटी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवस्वराज्य दिनी महिला पदाधिकारी व अधिकारी यांच्यात मारहाण हा चर्चेचा विषय ठरत आहे. हा सर्व प्रकार अत्यंत लाजीरवाणा असल्याचेही बोलले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links