BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2129 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

निसर्गाचा निर्दयीपणा ! वीज पडून तिघांचा दुर्दैवी  मृत्यू 

निसर्गाचा निर्दयीपणा ! वीज पडून तिघांचा दुर्दैवी  मृत्यू 

खमारी (बुज) परिसरातील घटना, २ जखमी 

न्यूज कट्टा / भंडारा, ८ जून 

मोहाडी तालुक्यातील आज सोमवार दि. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात काळाकुट्ट ढगांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर २ वाजताच्या सुमारास जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसात तालुक्यातील खमारी (बुज) परिसरात २ ते २.३० वाजताच्या सुमारास वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

मोहाडी तालुक्यातील खमारी (बुज) येथिल रतिराम उपराडे यांच्या शेतात मशागतीची काम करत असताना अचानक वीज कोसळल्याचा मोठा आवाज झाला. शेतात काम करीत असलेले अनिता फत्तु सव्वालाखे (45), आशा शंकर दमाहे (45) तसेच अशोक फिरतलाल उपराडे (48) यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले. तर जवळच असलेले रतिलाल उपराडे आणि पल्लवी रतिलाल उपराडे (19) हे दाम्पत्य जखमी झाले. 


वीज अंगावर पडताच तिघांच्याही ओरडण्यानेआजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तिघेही जागीच गतप्राण झाले होते. या घटनेने खमारी (बुज) परिसरात शोककळा पसरली आहे.  

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links