BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

4180 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

हृदय विकाराच्या झटक्याने वीर जवानाचा मृत्यू

हृदय विकाराच्या झटक्याने वीर जवानाचा मृत्यू
   लाखांदूर प्रतिनिधी

तालुक्यातील पार्डी येथे सासुरवाडीला नातेवाईकांची भेट घेण्यासाठी आले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे रात्रीला त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले . मात्र काही वेळातच १३ जुन रोजी मध्यरात्रीच्या २ वाजेच्या सुमारास त्या वीर जवानांची प्राणज्योत मावळली .

प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील पार्डी येथील  विलास ताराम यांचे जवाई होते . नामे खुशाल गावराने वय (२८) रा . चिरचाली . ता . कुरखेडा . जि . गडचिरोली . येथील रहिवाशी होते . सि . आर . पी . एफ . या पदावर दिल्ली येथे कार्यरत होते . त्यांच्या पश्चात पत्नी . तीन महिन्याचा मुलगा व आई . वडील असा परिवार आहे .

अशा वीर जवानांना यांच्या गावा कडे रवाना करतेवेळी श्रद्धांजली अर्पण करताना पारडी चे सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले . पोलीस विभागाचे पोलीस संदीप भाऊ ताराम . कर्मचारी . व नातेवाईक उपस्थित असून पारडी गावात  वीर जवानाच्या  निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे .

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links