BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1604 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


बेळगाव

धक्कादायक! ‘फादर्स डे’ दिवशीच पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या

धक्कादायक! ‘फादर्स डे’ दिवशीच पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या

 

न्यूज कट्टा ब्यूरो / दि. 21 जून 

बेळगाव: काल सगळीकडे ‘फादर्स डे’चे सेलिब्रेशन होत असताना बेळगावात मात्र एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात घडली आहे.

आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव काडप्पा रंगापुरे (वय 42) असे असून कीर्ती (वय 20) आणि स्फूर्ती (वय 18) अशी मुलींची नावे आहेत. या तिघांनीही घरात गळफास घेवून आत्महत्या केली. काडप्पा यांची पत्नी चन्नव्वा रंगापुरे (वय 40) यांचे एक आठवड्यापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानंतर आता काडप्पा यांनी आपल्या राहत्या घरीच दोन्ही तरुण मुलींसह गळफास घेवून आत्महत्या करून जीवन संपवल्याने संपूर्ण कुटूंबच उध्वस्त झाले आहे. पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने आणि आता पुढे कसे होणार या चिंतेपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आत्महत्येची घटना कळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. चिकोडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. फादर्स डे दिवशीच पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याच्या घटनेने ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links