BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

813 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नवी दिल्ली

खरंच तुम्हाला सलाम! पाठीवर मुल, हातात लसींचा बॉक्स अन् समोर वाहणारी नदी ओलांडून लसीकरणासाठी ‘ती’ पोहचली गावात

खरंच तुम्हाला सलाम! पाठीवर मुल, हातात लसींचा बॉक्स अन् समोर वाहणारी नदी ओलांडून लसीकरणासाठी ‘ती’ पोहचली गावात

 न्यूज कट्टा / नवी दिल्ली , २६ जून 

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र असे असले तरी देशावर तिसऱ्या लाटेचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे या धोक्याच्या अगोदरच प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. त्यासाठी देशाचे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र अजूनही देशाच्या दुर्गम भागात लसीकरणाच्या म्हणाव्या तशा सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचे दिसत आहे. याचे जिवंत उदाहरण सध्या झारखंडमधून समोर येत आहे.

 

देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी डोंगराळ तर काही ठिकाणी बर्फाळ प्रदेशात आरोग्य कर्मचारी अथक प्रयत्न करून पोहचत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या अशाच एका आरोग्य कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठता आणि खडतर प्रवासाची जाणीव करून देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील या फोटोमध्ये एक महिला आरोग्य कर्मचारी आपल्या उजव्या खांद्यावर लसीकरणासाठी लागणारा  बॉक्सज्यात लसी ठेवण्यात येतात तो आणि  पाठीवर लहान बाळाला घेऊन गुडघाभर पाणी असणाऱ्या नदीपात्रातून चालताना दिसत आहे. एका दुर्गम भागातील गावामध्ये लसीकरणासाठी ही माहिला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव मानती कुमारी असल्याचे सांगण्यात येत  आहे. ही मानती ही चतमा येथील उप आरोग्य केंद्रावर ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी म्हणून काम करते. ती तिथे एएनएम (Auxiliary Nurse Midwif) पदावर कामाला आहे. मानती ही करोनाच्या लसीकरणाचे काम करत नसली तरी ती दर महिन्याला अक्सी पंचायतमधील एका गावामध्ये आठवड्यातून एक दिवस मुलांना आवश्यक असणाऱ्या लसी देण्यासाठी जाते.

मानती ही झारखंडमधील लातीहार जिल्ह्यातील माहुआधूर येथे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून मागील एका आठवड्यात येथील नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र पाणी वाढले असले तरी मानतीने आपले काम थांबवलेले  नाही. ती आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी जाते.

बुरार नदीमधून जाताना मानतीचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो आता व्हायरल झाला आहे. आतापर्यंत मानतीने तीन गावांमधील लहान मुलांचे लसीकरण पूर्ण केले आहे. मानतीचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

अनेकांनी मानतीचे  कौतुक केले आहे. अशी लोक करोना संकटाच्या कालावधीमध्ये आशेचे किरण आणि उत्साह वाढवणारी तसेच प्रेरणा देणारी ठरतात, अशा लोकांमुळे माणुसकी आणि साकारात्मकता जिवंत आहे, अशा शब्दामध्ये मानतीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links