BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

554 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


बिजींग

अरूणाचल प्रदेशपर्यंत पोहोचली चीनची बुलेट ट्रेन

अरूणाचल प्रदेशपर्यंत पोहोचली चीनची बुलेट ट्रेन

वृत्तसंस्था / न्यूज कट्टा दि. २६ जून 
 
बिजींग – चीनने भारतीय सीमेच्या हद्दीनजिक अरूणाचलप्रदेशच्या अगदी जवळपर्यंत आपली बुलेट ट्रेन व्यवस्था सुरू केली आहे. ताशी 160 किमी वेगाने वीजेवर चालणारी ही सेवा त्यांनी सुरू केल्याने भारताची चिंता वाढली आहे.
 
ल्हासा आणि नायींग गावांना जोडणारी ही बुलेट ट्रन आहे. नायींग हे शहर अरूणाचलप्रदेशच्या अगदी जवळ आहे. या रेल्वेचे प्रत्यक्ष उद्‌घाटनही झाले आहे. तिबेट शहरातील वीजेवर चालणारा हा पहिलाच रेल्वे प्रकल्प आहे.
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वत: या रेल्वे प्रकल्पात लक्ष घातले होते. गेल्या डिसेंबरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांनी तिबेटला जोडणाऱ्या रेल्वे सेवांच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची सुचना केली होती. 435 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावर 47 बोगदे आणि 120 पुल बांधण्यात आले आहेत.
 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links