BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

435 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


व्हिएन्ना

संशोधन : प्लास्टिक पचवण्याची गायींमध्ये ताकत ऑस्ट्रियातील विद्यापीठाने केले संशोधन

संशोधन : प्लास्टिक पचवण्याची गायींमध्ये ताकत

ऑस्ट्रियातील विद्यापीठाने केले संशोधन

 
वृत्तसंस्था / न्युज कट्टा ब्युरो, दि. ४ जुलै
 

व्हिएन्ना : जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना गाईच्या पोटामध्ये अशा प्रकारचे तीन विशेष जीवाणू आढळले आहेत की, त्यामुळे गाय कोणत्याहि प्रकारचे प्लास्टिक पचवू शकते. ऑस्ट्रेयातील विद्यापीठातील संशोधकांनी गायीच्या पोटातील या जिवाणूंचा शोध लावला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड लाईफ सायन्सेस मधील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गायीच्या पचनयंत्रणेमध्ये असे जीवाणू आढळले आहेत की ते प्लास्टिक सारखे सर्वसाधारणपणे नष्ट न होणारे पदार्थही पचवू शकतात. सर्व प्रकारचे प्लास्टिक पचवण्याची ताकद या जिवाणू मध्ये आहे.

लोकांच्या वापरासाठी पिशव्या तयार करण्य साठी जे प्लॅस्टिक वापरले जाते, ते प्लॅस्टिक जर गायीच्या पोटात गेले तर गाय ते सहजपणे पचवू शकते, असा या वैज्ञानिकांचा दावा आहे. पोटातील हे जिवाणू खास प्रकारच्या एंजाइम चा वापर करून ही पचन प्रक्रिया पूर्ण करतात.

विद्यापीठातील संशोधकांनी अतिशय छोट्या स्तरावर हे संशोधन केले आहे. आगामी कालावधीमध्ये या संशोधनाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून गाईच्या पोटातील या जिवाणूंचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करणे शक्य आहे की काय या बाबतचा शोधही घेतला जाणार आहे.

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links