BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

79 Views

By न्यूज कट्टा


तुमसर

तुमसर घनकचरा व्यवस्थापनाच्या ई-निविदेवर शिवसेनेचा आक्षेप

न्यूज कट्टा  / तुमसर

नगरपरिषद तुमसर क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विलंगिकृत कचरा गोळा करणे, बंदिस्त वाहनाद्वारे वाहतूक करणे व त्यावर प्रक्रिया करणे यासाठी ई- निविदा काढण्यात आली मात्र निविदेत अट क्रमांक 5, 7, 8, 10, 11 व 16 ह्या अटी व शर्ती स्थानिक कंत्राटदारांना मान्य नसून त्यावर आक्षेप शिव सेनेने नोंदविला आहे.

तुमसर नगरपालिकेच्या ई-निविदेत पूर्णपणे एखाद्या व्यक्तीला लाभ पोहचविण्यासाठी अश्या अटी व शर्ती घालून स्थानिक पातळीवरील कंत्राटदारांना ही ई-निविदा भरण्यापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान निदर्शनास येत आहे. सदर ई-निविदेच्या अटी व शर्ती शिथिल करून स्थानिक स्तरावर कंत्राटदारांना ई-निविदा प्रक्रिया भरण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी चंदन पाटील यांना शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाची प्रत तुमसर नगरपालिकेचे मुख्यधिकारी विजय देशमुख यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना निवेदन सादर करतांना शिवसेनेचे जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर सह स्थानिक कंत्राटदार व पदाधिकारी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links