BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

883 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

लाखांदूर नगरातील तीन प्रभागात पाणीच पाणी

लाखांदूर नगरातील तीन प्रभागात पाणीच पाणी 

करोडो रुपयाचा निधी पाण्यात ...

 

माजी नगरसेविकेच्या घरात घुसले पाणी 

   अभिमन ठाकरे

 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखांदूर, ९ जुलै

 

मागील आठ दिवस पावसाने दडी मारली होती . कडाक उन्हामुळे जाणवत होता . त्यामुळे शेतकर्‍यासह सर्वच " येरे येरे पावसा " म्हणत असताना ८ जुलै रोजी पहाटेपासूनच दुपारी १ वाजता पर्यंत सतत धार पडलेल्या पावसामुळे लाखांदूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले . तर स्थानिक लाखांदूर नगरात या पावसामुळे नाल्या गटारे तुडुंब भरत दोन प्रभागातील जवळपास 60 ते 70 घरामध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिकांकडून" पैसा झाला खोटा . पूर आला मोठा " असा एकच सूर निघाला होता.

बालपणात येरे येरे पावसा तुला देतो पैसा . पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा . हे गाणं सर्वांनाच आवडत असे . हे गाणं आज स्थितीत लाखांदूर नगरात सत्यात उतरले असून येथील . वार्ड क्रमांक .८ व ९ या दोन प्रभागातील गटारा बुडली पाणी घुसल्याने दिसून आले येथील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आमच्या घरात पाणी असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे . एकीकडे नगरपंचायत प्रशासन करोडो रुपयाची विकास कामे केली असल्याचा अफवा पसरत करीत असताना या तीन प्रभागातील गठराची दुरवस्था कशी यावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत .

माजी नगरसेविकेच्या घरात देखील पाणीच पाणी 

नुकत्याच चार महिन्यापूर्वी लाखांदूर नगर पंचायत चा कार्यकाळ संपला असून वार्ड क्रमांक ९ च्या नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका वनिता मिसाळ . यांच्या संपूर्ण घरात देखील पाणीच पाणी घुसल्याने महापूर पाहायला मिळाले आहे . चार महिन्यापूर्वी वाढीच्या प्रमुख राहिलेल्या या माजी नगरसेविकेला स्वतःची समस्या आता इतरांसमोर कथन करावी लागली . स्वतःच्या घरा समोरील समस्या त्या सोडवू शकल्या नाहीत . मात्र घरात पाणी घुसताच मुख्याधिकारी कडे तक्रार करायला विसरल्या नाहीत .

माजी गटनेत्यांच्या प्रभागात सर्वाधिक नुकसान 

येथील नगरपंचायत वर आतापर्यंत भाजपाची एक हाती सत्ता होती . तर काँग्रेसच पाच नगरसेवक घेऊन विरोधी बाकावर होती . सध्यास्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक व गटनेते विनोद ठाकरे वार्ड क्रमांक ८ मध्ये राहिलेले आहेत . सतधरा पडलेल्या  या पावसाची सर्वाधिक झळ या माजी गट नेत्याच्या प्रभागात बसली असून अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचे महापूर पाहायला मिळाले आहे .

मुख्याधिकारी नी केली प्रभागाची पाहणी

 प्रभाग क्रमांक ५ .८ व ९ मधील अनेक याच्या घरात पाणी घुसल्याची माहिती होताच येथील नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ . सौरभ कावळे . यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तिन्ही प्रभागाची पाहणी करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व गटाची समस्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्या वेळी सांगितले .

  प्रतिक्रिया : 

१) आमच्या संपूर्ण प्रभागातील पाणी गटारी च्या माध्यमातून वाहून जाण्याचा मोठा नाला एका महिलेने उन्हाळ्यामध्ये बुडविला असल्या कारणामुळे पहिल्यांदा या वार्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्या नाल्याचा उपसा केल्यास तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची मला खात्री आहे .
     - - वनिता लालाजी मिसाळ . माजी नगरसेविका 


 २) नगरपंचायत वर पाच वर्ष भाजपाची एक हाती सत्ता होती आम्ही पाच वर्ष सत्तारूढ पक्षाला नगरातील १७ ही प्रभागाच्या विविध समस्या मांडल्या होत्या . मात्र सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी आमचे ऐकले नाही त्यामुळे अशी परिस्थिती महापूर उद्भवली आहे .
   --- रामचंद्र भाऊ राऊत . माजी 
गटनेता .

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links