BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

519 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


मुंबई

नरेंद्र मोदी, रजनीकांत आणि अक्षयनंतर आता ‘या’ अभिनेत्याने स्वीकारले बेअर ग्रिल्सचे आव्हान

नरेंद्र मोदी, रजनीकांत आणि अक्षयनंतर आता ‘या’ अभिनेत्याने स्वीकारले बेअर ग्रिल्सचे आव्हान

 

न्यूज कट्टा ब्यूरो

मुंबई, दि. 14 जुलै: डिस्कव्हरी चॅनेलचा ‘Man vs Wild’ हा कार्यक्रम जगभर प्रसिध्द आहे आणि याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार , रजनीकांत या सारखे अनेक बडे चेहरे झळकले होते. आता याच यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. ते नाव म्हणजे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता “रणवीर सिंग’.

रणवीर नुकतंच बेअर ग्रिल्सच्या शोच्या चित्रीकरणासाठी परदेशात रवाना झाला आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार रणवीर या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचर करताना दिसरणार आहे. नेटफ्लिक्सशी चर्चा केल्यानंतर बेअरने रणवीरला या शोसाठी विचारले होते. रणवीर या शोसाठी उत्साही आहे. या शोचा बिग बजेट आहे. यावेळी ते पूर्वेकडील युरोपियन देशामध्ये या शोचे चित्रीकरण होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links