BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

136 Views

By NewsKatta


मुम्बई

11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक

11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक
न्यूज कट्टा

केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.

केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे उद्या रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. 

आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहे. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links