BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

932 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदुर

चिखलणी करतांना ट्रक्टर इंजीन पलटुन चालक जागीच ठार

चिखलणी करतांना ट्रक्टर इंजीन पलटुन चालक जागीच ठार

 मडेघाट शेतशिवारातील घटना

न्यूज कट्टा / लाखांदुर, १९  जुलै

 

धान रोवणी पुर्व शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करतांना चिखलात फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात  ट्रॅक्टर इंजीन पलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मडेघाट शेतशिवारात घडली. संदिप आंदराव ढोरे (२८) रा कन्हाळगाव असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी मृतक सकाळच्या सुमारास मडेघाट शेतशिवारातील महादेव राऊत नामक शेतकऱ्याच्या शेतात धान रोवणीपूर्व ट्रॅक्टरने चिखलणी काम करीत होता. स्वराज कंपनीच्या विना क्रमांक ट्रॅक्टर इंजिनने चिखलणी काम करीत असतांना अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर इंजिन फसला. यावेळी मृतक चालकाने ट्रॅक्टर इंजिनच्या मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर इंजिन अचानक पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रॅक्टर इंजिन चालक इंजिन खाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती जगदीश ढोरे व संदीप तुपटे यांना होताच  संबंधितांनी गावकऱ्यांसह लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप राऊत, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टर इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links