BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

960 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा 24 जुलै पासून होणार

तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा 24 जुलै पासून होणार
    

न्यूज कट्टा/ भंडारा, 21 जुलै
    
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2021 परीक्षेचे 6 व 8 व्या सेमेस्टरची परीक्षा तांत्रिक कारणामुळे जे विद्यार्थी  देऊ शकले नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा 24, 25 व 26 जुलैला होणार आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्लू बी.सि.ए., बि.बि.ए., बी.फ़ार्म. इंजिनीअरिंग, होटल म्यानेजमेंट च्या 6 व 8 व्या सेमेस्टरच्या अभ्यासक्रमाच्याची परीक्षा होणार आहे, अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी दिली आहे. 

नेटवर्क नसणे, मोबाईलमध्ये समस्या होणे, वेळेवर पेपर सबमिट न होणे तसेच वेळापत्रक माहीत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. अनेक तक्रारींचा पाठ पुरावा करण्यात आला व कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये असा पवित्रा आपण घेतल्याचे प्रवीण उदापूरे यांनी सांगितले.

विविध कारणाने परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने नव्याने वेळापत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. सदर वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रविण उदापूरे यांनी दिली आहे. सदर परीक्षा ह्या 24, 25, 26 जुलै 2021 ला ऑनलाइन होणार आहेत.

 

विद्यार्थ्यांनी संबंधीत महाविद्यालयाशी थेट संपर्क साधावा

- सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांचे आवाहन

परीक्षेपूर्वी संबंधीत महाविद्यालयाशी या संदर्भातील सोपस्कार पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा,  नागपूर विद्यापीठाच्या वेबसाईटवर भेट देऊन वेळापत्रक डाउनलोड करून घ्यावे. काही कारणाने विद्यार्थ्यांना समस्या उद्भवल्यास त्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

परीक्षेदरम्यान नागपूर विद्यापीठाने हेल्पलाइन नंबर्स सुद्धा जारी केलेले आहेत. या हेल्पलाइन नंबरवर परीक्षे दरम्यान होणाऱ्या समस्येची माहिती देऊन आपल्या समस्येचे निराकरण करावे. असे आवाहन सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links