BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

806 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना

 

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपन्यांना दयाव्यात

 

• कृषि विभागाचे आवाहन

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, २३ जुलै

खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गीक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षीत क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे वरील बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गीक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप संबंधीत विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवतांना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका, जिल्हा कार्यालयात किंवा कृषि, महसूल विभागास देणे आवश्यक आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी एचडीएफसी इग्रो. जनरल इन्शो. ही विमा कंपनी असून 18002660700 हा कंपनीचा टोल फ्रि क्रमांक आहे. विमा कंपनीचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी श्री. पटले-7304528741, भंडारा तालुका प्रतिनिधी सचिन शेटे-9552235391, मोहाडी तालुका प्रतिनिधी संतोष बोपचे-7770043035, तुमसर तालुका प्रतिनिधी संदेश ऊके-8830417612, पवनी तालुका प्रतिनिधी अतुल फुले-9404318956, साकोली तालुका प्रतिनिधी विवेक टिकेकर-9765741007, लाखनी तालुका प्रतिनिधी अनुराग गजभिये-7770058571 व लाखांदूर तालुका प्रतिनिधी व्यंकटेश येवले-9373573977 आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links