BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

813 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा युवक बिरादरीच्या वतीने ऑनलाईन स्पर्धा

भंडारा युवक बिरादरीच्या वतीने ऑनलाईन स्पर्धा

सहभागाची अंतिम तारीख 5 ऑगस्ट

न्युज कट्टा / भंडारा, २ ऑगस्ट 

भंडारा युवक बिरादरी शाखेद्वारे दरवर्षी क्रांतीस्वर भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सामूहिक कार्यक्रम घेण्यास बंदी आहे त्यामुळे या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. 

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती,  क्रांती दिनाचे 79 वे वर्ष, भारत देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच युवक बिरादरी संस्थेचे भंडारा युवक बिरादरी शाखेचे संस्थापक स्व. मनोज दाढी यांनी सुरु केलेल्या या शाखेला 9 ऑगस्ट 2021 रोजी 27 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्पर्धेत वाद्य वादन (चर्म व तंतू) स्पर्धा, कथाकथन,  स्वयंलिखित काव्यवाचन स्पर्धा व भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा तसेच दिनाक 9 ऑगस्ट 2021 ला गर्दी न करता दरवर्षीप्रमाणे हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक भंडारा येथे सकाळी 8.30 वाजता मशाल प्रज्वलित करून शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे आणि वृक्ष लावून 'हिरवे आंगन' या स्पर्धेची सुरुवात करायची आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत 'दो बिघा जमीन' याअंतर्गत शेतीच्या सकारात्मक बाजू या विषयावर युवकांच्या उपस्थितीत मुक्तचिंतन घेण्यात येणार आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी व खुल्या गटात १६ ते २५ या वयोगटातील युवकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. राष्ट्रीय नेतृत्व, देशाभिमान जागृत करणारी सामाजिक व राष्ट्रीय मूल्य जोपासणारी, कलाकारांना व लेखकांच्या लेखनाला वाव देणाऱ्या या स्पर्धा आहेत तरी या स्पर्धेत सहभागी होऊन तिन्ही स्पर्धेत दि. 5/8/21 पर्यंत फोनव्दारे नाव नोंदवावे व संबंधित स्पर्धेतील सहभागाचे  व्हिडीओ व्हाट्सएप्प किंवा टेलिग्राम व्दारे दि.4/8/21 सायंकाळी 5 वा. पर्यंत पाठवता येतील, सर्व स्पर्धांना आकर्षक पारितोषिक आहेत. सर्व स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धांचे पारितोषिक आणि अन्य माहितीसाठी स्पर्धा संयोजक सुरेंद कुलरकर (8888652443), राधेशाम बांगडकर (9797657482), प्रशांत वाघाये, प्रज्वल निंबार्ते (9545299554), गौरी दाढी (8975872997), वर्षा मनोज दाढी (9822572284), विक्रम फडके (9421896363), वैभव कोलते (9730747612) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भंडारा युवक बिरादरीच्या वतीने अध्यक्ष पंकज इंगोले तथा सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links