BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

130 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

11 रोजी संजय मते यांच्या नेतृत्वात ओबीसी बाईक रॅली  

11 रोजी संजय मते यांच्या नेतृत्वात ओबीसी बाईक रॅली  
12 डिसेंबरच्या ओबीसी क्रांती मोर्चाची पूर्वतयारी 

न्यूज कट्टा  / भंडारा 

ओबीसी वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी ओबीसी क्रांति मोर्चा महाराष्ट्र राज्य व कर्मचारी संघटनांचा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी आयोजित धडक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी संयोजक संजय मते यांच्या नेतृत्वात बाईक रॅली चे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. 

शनिवार च्या मोर्च्याची सुरुवात शास्त्री चौक भंडारा येथून तर शुक्रवार रोजी गणेशपूर येथील शिवाजी चौकातून बाईक रॅलीची सुरुवात होणार असून कार्यकर्ते जोमात रॅलीची तयारी करताना दिसून आले. "रॅली द्वारे पूर्ण भंडारा शहर भ्रमण करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल," असे संजय मते यांनी सांगितले. ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी असताना सुद्धा 2021 च्या जनगणनेत याचे प्रावधान करण्यात आले नाही.

ओबीसींची वेगळी जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी, राज्यात पोलिस व राज्य सेवा भरती लवकरात लवकर सुरू करावी व इतर मागण्यासाठी हा धडक मोर्चा राहील. शनिवारी मोर्च्याची सुरुवात शास्त्री चौक, भागीरथा भास्कर हायस्कूल च्या पाटांगणा वरुन होईल असे मोर्च्याचे संयोजक यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन ओबीसी युवा नेते पवन मस्के यांनी केले आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links