BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1016 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

धानाचे पोते अंगावर पडल्याने ४ मजूर गंभीर

धानाचे पोते अंगावर पडल्याने ४ मजूर गंभीर 

 

 दिघोरी / मोठी येथील घटना

 जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी 

 

न्यूज कट्टा / लाखांदूर, ४ सप्टेंबर

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात धान्य उचल करण्याची काम सुरू होते . अचानक धानाने  भरलेले पोते  वरुन खाली पडल्याने ४ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी  ११ . ३० वाजताच्या सुमारास दिघोरी/ मोठी येथे घडली .
   
 प्राप्त माहितीनुसार दिघोरी मोठी येते शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र असून येथे पावसाळी व उन्हाळी हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करून धानाची साठवणूक करण्यात येते . आज नेहमीप्रमाणे गोदामांमध्ये धान्य उचल करण्याचे काम  सुरू होते सदर कामावर एकूण २१ मजूर काम करत होते. अचानक धानाचे भरलेले पोते वरून खाली  पडण्यास सूरवात २१ मजुरा पैकी ४ मजूर धानाच्या पोत्या खाली दबून  गंभीररित्या जखमी झाले.

सखाराम सलामे, ताराचंद मसराम, प्रभू अवचट, गणेश मेश्रम हे गंभीर रित्या जखमी असून त्यांना तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचासाठी दाखल करण्यात आले .जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात  हलविण्यात आले आहे. 

  

जखमींना आर्थिक मदत द्या 

या घटनेत जखमी झालेले मजुर गरीब कुटुंबातील असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करणे जरुरी आहे . त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आगाशे , माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे , माजी पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे यासह दिघोरी येथील नागरिकांनी मागणी केली आहे .

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links