BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

449 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचा हल्ला बोल

भंडारा जिल्हा  युवक काँग्रेसचा हल्ला बोल

न्यूज कट्टा / भंडारा, १७ सप्टेंबर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशातील २ कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार उपलब्ध करून देणार असे अच्छे दिनचे आश्वासन देऊन देशातील अनेक सुशिक्षित तरुणांची फसवणूक केली. आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मुकुंद साखरकर, महासचिव जिल्हा कॉंग्रेस यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार आंदोलन करण्यात आले.

 केंद्र सरकारच्या अनियोजित व घातक धोरणामुळे गेल्या सहा वर्षात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. यामुळे युवा वर्गात असंतोष निर्माण झाला असून त्याचे परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्तरावर होत आहे शेतकऱ्यांचा युवकांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस भंडारा जिल्हा काँग्रेस महासचिव मुकुंद साखरकर यांचे नेतृत्वात त्रिमूर्ती चौक भंडारा येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करून साजरा करण्यात आले करण्यात आला त्या त्यावेळी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे,भंडारा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भूषण टेंभुर्णे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री बोरकर, भंडारा शहराध्यक्ष प्रशांत देशकर, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अनेक जमा पाटील, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव मंगेश हुमने, काँग्रेस उपाध्यक्ष सचिन फाले,एम एस वाय चे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, शाईन मून, जितेंद्र नागदेवी, साहिल मेश्राम, निखिल तिजारे, सुनील सुखदेवे, शुभम तोंडाने, प्रणय नेवारे, अंकित गोंडाणे, सचिन सावलकर, निखील आग्लावे, जय डोंगरे, आनंद चिंचखेडे, जनार्दन निंबरते, मंगेश वंजारी, अतुल भोयर, पियुष तेंडर, साहिल पत्रे, सौरभ श्रावणकर, चेतन बांडेबुचे, प्रिया निमजे, वैष्णवी आंबीलकर, प्रतीक्षा सुंकिंवार, मुकुल पाडोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links