BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

596 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


सांगली

“बसपन का प्यार!”; उद्धाटन कार्यक्रमात लहानग्याची जयंत पाटलांनी केली इच्छा पूर्ण

“बसपन का प्यार!”; उद्धाटन कार्यक्रमात लहानग्याची जयंत पाटलांनी केली इच्छा पूर्ण

 

न्यूज कट्टा ब्यूरो/ सांगली 19 सप्टेंबर: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात एक असा किस्सा घडला आहे ज्यामुळे उपस्थितांची मने एका लहानग्याने जिंकली आहेत.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना 6 वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. यावेळी त्याचा निरागस भाव सर्वांच्या समोर आला आणि  संचितने चक्क  नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंत पाटलांकडे व्यक्त केली. जयंत पाटील यांना देखील संचितची इच्छा पूर्ण करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी त्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्याने फोडलेल्या नारळानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान, जयंत पाटील यांनी संचितची इच्छा पूर्ण केल्यामुळे उपस्थितांची आणि गावकऱ्यांची मने त्यांनी जिंकली.

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links