BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3550 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


पाटना

करोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट; अर्ध्या तासात तडफडून मृत्यू

करोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट; अर्ध्या तासात तडफडून मृत्यू

- चाचणी केंद्रावरील डॉक्टरचा टेस्टदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा नकार

 

वृत्तसंस्था/ पाटना, 19 सप्टेंबर: देशात करोना महामारीमुळे अनेकांचे जीव गेले. करोनाची दुसरी लाट ओसरली आहे.  हे सगळं जरी दिलासा देणारे असले तरी केवळ निष्काळजीपणामुळे काही रुग्णांना अन् लोकांना  आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना बिहारमधील  पाटनामध्ये घडली आहे. पाटनातील करोना टेस्ट सेंटरमध्ये कोरोना टेस्ट करताना किटमधील दांडी महिलेच्या गळ्यात अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव जासो देवी ( वय ६५ )असून त्या करोना टेस्ट करण्यासाठी चाचणी केंद्रावर गेल्या होत्या. चाचणी करतांना यावेळी  त्यांच्या  तोंडात कोरोना चाचणी किट घालण्यात आले. मात्र वैद्यकीय व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे ते तोंडातच अडकले.  त्यानंतर अर्धा तास ही काढण्याचा प्रयत्न  करण्यात आला. मात्र काही वेळातच  त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यातच त्या बेशुद्ध पडल्या.  आणि साधारण अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर  डॉ. कमलेश कुमार यांनी टेस्टदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा नकार दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links