BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1450 Views

By न्यूज कट्टा


लाखनी

ग्रीनफ्रेंड्स तर्फे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन मोहीम

ग्रीनफ्रेंड्स तर्फे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन मोहीम

- लाखनी पोलिस स्टेशन येथील गणेश मूर्ती तसेच अनेक नागरिकांनी केले घरगुती गणेश मुर्ती चे विसर्जन

- ग्रीनफ्रेंड्सने केले वृक्षदान
 

न्यूज कट्टा/ लाखनी, 22 सप्टेंबर: ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी परिसरात मागील 14 वर्षांपासून सातत्याने गणेशोत्सवात ध्वनी, वायू व मुख्यत्वे जल प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही  गणेशोत्सव ही संकल्पना राबवित असून त्या अंतर्गत मातीच्या तसेच जलरंगाचा वापर असलेल्या मूर्तीचा प्रचार-प्रसार ,निर्माल्य तलावात न फेकता संकलन करून निर्माल्य खत तयार करणे आणि गणेश मूर्तीचे तलाव,नदी- नाल्यात विसर्जन न करता कृत्रिम गणेश कुंडात विसर्जन करणे हे उपक्रम सातत्याने राबवित आहे

यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव उपक्रम करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राबविण्यात आला.या उपक्रमाला अभा अंनिस तालुका शाखा लाखनी व नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले. या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धा घेण्यात  आली त्याचबरोबर ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य संकलन कक्ष तयार करण्यात आला.या विसर्जन कुंडात लाखनी पोलीस स्टेशनच्या गणेश मूर्तीचे सातव्या दिवशी  विसर्जन पोलीस निरीक्षक तसेच नायक पोलीस आणि कॉन्स्टेबल यांच्या उपस्थितीत श्रद्धापूर्वक आणि भाविक वातावरणात करण्यात आला. पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कोरचे व युवराज मस्कर, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, दिलीप घरडे, माधव वणवे, गौरी उईके, गोपनीय विभागाचे उमेश शिवणकर, कमांडो पथकाचे प्रभारी सुरेश आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल राजू बडवाईक व इतर अनेक पोलीस कर्मचारी, महिला पोलीस आणि होमगार्ड पथकाचे जवान उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक व इतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना ग्रीनफ्रेंड्स तर्फे वृक्षभेट देऊन स्वागत  ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह  प्रा.अशोक गायधने,अध्यक्ष अशोक वैद्य तसेच पदाधिकारी पंकज भिवगडे, मयुर गायधने, आरिफ बेग, दिलीप भैसारे, मुकुल गभने, प्रा.अर्चना गायधने यांचे हस्ते करण्यात आले. विसर्जनाच्या दहाव्या दिवशी शिल्पा सोपान गायधने, खुशाग्र प्रकाश गभने, दीपक सूनने आणि प्रशांत रमेश गभने तसेच अनेक विद्यार्थ्यांनी घरी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन भाविक वातावरणात ग्रीनफ्रेंड्सच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडात करण्यात आले.

सर्वाना वृक्षभेट ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकाऱ्याच्या हस्ते यावेळी देण्यात आले. यावेळी भाविकांनी आणलेला निर्माल्य तसेच विविध गणेश मंडळाकडून गोळा करण्यात आलेला निर्माल्याचे संकलन निर्माल्यकक्षात करण्यात आले. गणेश मूर्तीची विसर्जित माती आणि निर्माल्यापासून लवकरच निर्माल्यखत तयार करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या उपक्रमाला साहाय्य ओम आगलावे, आर्यन धरमसारे, कार्तिक सेलोकर, आर्यन देशमुख, निखिल देशमुख, सुहानी पाखमोडे, स्वीटी लांजेवार, मोहन आगरे इत्यादींनी केले. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links