BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

624 Views

By न्यूज कट्टा


भंडारा

नॅकच्या विकेंद्रीकरण धोरणामुळे समाज व विद्यार्थ्यांप्रती प्राध्यापकांच्या उत्तरदायित्वात वृद्धी: डॉ. विकास ढोमणे

नॅकच्या विकेंद्रीकरण धोरणामुळे समाज व विद्यार्थ्यांप्रती प्राध्यापकांच्या उत्तरदायित्वात वृद्धी: डॉ. विकास ढोमणे

- रा. तु. म. नागपूर विद्यापीठाशी संलग्न आठ महाविद्यालयांतर्फे राष्ट्रीय आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाला ज. मू. पटेल महाविद्यालयात सुरुवात

- “चलता है” दृष्टीकोन न बाळगता अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करून प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा- डॉ. श्रीहरी पिंगळे 

 

न्यूज कट्टा/ भंडारा, 22 सप्टेंबर: "नॅकने महाविद्यालयांचे मुल्यांकन करताना महाविद्यालयातील प्रत्येक स्त्रोत आणि संबंधित प्रत्येक भागधारकाला उत्तरदायित्व दिलेले आहे. त्यामुळे नॅकमध्ये चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला त्यांच्या समाज आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या उत्तरदायीत्वांचे आकलन करीतच आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे," असे विधान स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले. महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमा अंतर्गत आभासी कार्यशाळेच्या आभासी उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित स्थानीय जे. एम. पटेल महाविद्यालय आणि नागपूर येथील संताजी महाविद्यालय, यशोदा महाविद्यालय, डॉ. एम.के. उमाठे महाविद्यालय, धरमपेठ एम.पी. देव विज्ञान महाविद्यालय, महिला महाविद्यालय आणि खापरखेडा येथील बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय यांनी नॅकने आपल्या मुल्यांकन धोरणात केलेल्या वर्तमान धोरणाच्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या आभासी कार्यशाळेचे दृक-श्राव्य आभासी माध्यमांद्वारे उद्घाटन संपन्न झाले.

या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करताना जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी नॅकच्या बदलत्या धोरणाचा आढावा घेतला. संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी यांनी या कार्यशाळेची प्रस्तावना विशद करताना वर्तमान काळातील प्राध्यापकांना माहिती-संप्रेषण तंत्रज्ञानाला आत्मसात करून त्यात प्राविण्य प्राप्त करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यशाळेचे प्रयोजन विशद करताना त्या पुढे म्हणाल्या की नॅकने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे जर आपण स्वतःला अद्यावत केले नाही तर स्वतःच्याच अधोगतीला प्राप्त होऊ. जे सक्षम असतील, तेच या समकालीन शिक्षण व्यवस्थेत टिकाव धरतील.

या कार्यशाळेत आजच्या सत्राचे साधन-व्यक्ती असलेले संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी अंतर्गत गुणवत्ता अहवालातील प्रथम प्रवर्गावर आपले व्याख्यान देताना अभ्यासक्रमाचे अध्यापन, आरेखन आणि त्यातून बाहेर पडणारे उत्पादन यांचे सविस्तर विवेचन केले. नॅकला सामोरे जाताना महाविद्यालयांनी त्यांना प्रमाणांच्या स्वरूपात आपल्या दस्तऐवजीकरणाची योग्य संरचना निर्माण करावी असा सल्ला त्यांनी दिला. सहभागी प्राध्यापकांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देताना “चलता है” असा दृष्टीकोन न बाळगता अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करूनच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेचे नियोजित उद्घाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी काही तांत्रिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या आभासी कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. उमेश बन्सोड यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. अपर्णा यादव यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनात या महाविद्यालयांच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षांचे समन्वयक डॉ. कार्तिक पणिक्कर, डॉ. श्रीकांत पाजणकर, डॉ. कृष्णा मेश्राम, डॉ. समीर नईम, डॉ. रत्नाकर लांजेवार, डॉ. अनिल डोडेवार आणि डॉ. संगीता चोरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. समारंभात सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य धनराज शेटे, प्राचार्य ज्ञानेश्वर नाईक, प्राचार्य अखिलेश पेशवे, प्राचार्य वंदना भागडीकर व प्राचार्य रामकृष्ण टाले आभासी स्वरूपात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रजिस्ट्रार पुरुषोत्तम नंदागवळी, डॉ. एस आर शर्मा, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. श्याम डफरे, डॉ. रोमी बिष्ट, डॉ. आनंद मुळे, डॉ. पद्मावती राव, डॉ. विणा महाजन यांनी सहकार्य केले. 

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links