BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1037 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

आता महाबळेश्वरच्या जंगलात दिसून आला 'बघिरा'

आता महाबळेश्वर च्या जंगलात दिसून आला 'बघिरा'

न्यूज कट्टा ब्यूरो/ 22 सप्टेंबर: घनदाट जंगलांनी वेढलेल्या सदाहरित महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे या गावात दुर्मीळ असलेला ब्लॅक पँथरचे दर्शन तेथील स्थानिक गुराख्याना झाले असून याबद्दलचा एक विडियो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. 

सदर घटने बाबत अधिक माहिती अशी की, कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये दिनांक 17 सेप्टेंबर 2021 रोज शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतामध्ये रवींद्र जाधव व सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना ब्लॅक पँथर चे दर्शन झाले.

ब्लॅक पँथरच्या दर्शन झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे. सदरील माहिती व या काळ्या बघिरा चा विडियो 'वन समाचार' या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध असून ते पाहण्याकरिता https://www.youtube.com/watch?v=dEa9rThOmRk&t=64s लिंक वर क्लिक करा. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links