BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

4082 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

जल्लोष : अखेर मनरो शाळेच्या आवारातील विवादीत बांधकाम थांबवण्याचे आदेश

जल्लोष : अखेर मनरो शाळेच्या आवारातील विवादीत बांधकाम थांबवण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश: "पूढील आदेशापर्यंत त्या परिसरात कुठलेही बांधकाम करु नये"

न्यूज कट्टा / भंडारा, 22 सप्टेंबर
 
भंडारा जिल्ह्यात मागील महिना भरापासून चर्चेत असलेल्या  ऐतिहासिक मनरो शाळेच्या पटांगणावरील विवादित व्यावसायिक बांधकामाला अखेर न्यायालयाचा दणका बसला आहे.मनरो शाळेच्या आवारातील विवादीत बांधकाम थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून "पूढील आदेशापर्यंत त्या परिसरात कुठलेही बांधकाम करु नये" असे मुंबई उच्च न्यायालयाचे असे आदेशात नमूद करण्यात आले. या आदेशामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून त्यांना पुढे लढण्याचे बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


मनरो शाळेत सुरु असलेल्या व्यावसायिक बांधकामाला शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने सदरील बांधकामाचे  काय होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पुढील आदेशपर्यंत मनरो शाळेच्या परिसरात कुठलेही बांधकाम करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असल्याचे वृत्त आहे.

या बांधकामात जिल्हयातील राजकारण्यांचे हस्तक्षेप असल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी कुठल्याही निवेदन व आंदोलनास जुमानले नाही. अखेर माजी विद्यार्थ्यांनी मुबंई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. चार दिवसापूर्वी खटला दाखल केला गेला व त्यावर उच्च न्यायालयाने या संबंधी झालेल्या सूनवाईत माननीय न्यायालयाने पूढील आदेशापर्यंत त्या परिसरात कुठलेही बांधकाम करु नये असे आदेश २२ सप्टेंबरला पारीत केले असुन वृत्त लिहीपर्यंत आदेशाची कॉपी न्यायालयाच्या वेबसाईट वर उपलब्ध झालेली नाही. 

मनरो शाळा बचाव पक्षाने शाळेचे माजी विद्यार्थी अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्यातर्फे बाजू मांडली. डॉ. नितीन तुरस्कर, अभिजीत वंजारी, मंगेश साकोरे, हर्षल वंजारी, स्वप्नील   भोंगाडे, महेश बुधे, प्रमोद मानापूरे, खिमेश बढीये, कार्तिक ठोसरे, डॉ. रत्नाकर बांडेबूचे या माजी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असुन विरोधी बाजूने अ‍ॅड.आनंद परचुरे यांनी काम बघितले आहे.
 

अखेर मनरोचे विद्यार्थी जिंकले
मागील अनेक दिवसापासून मनरो शाळेत सुरु असलेल्या व्यवसायिक बांधकाम विरोधात माजी विद्यार्थी व मनरौ प्रेमिनी आंदोलन सुरु केले होते. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाने सदर व्यवसायिक बांधकामाला स्थगिती दिली आहे. हे या चळवळीचे पहिले यश आहे. 


कुठ्लाही राजकिय पाठींबा नसताना विद्यार्थी किल्ला लढवत होते . सर्व मनरो प्रेमिचे अभिनंदन. पण आता पूर्ण मैदान स्वछ करणे आणि मनरोला गत वैभव प्राप्त करुन देणे आहे.

लढाई कायम, पूर्ण यश येईस्तोवर लढू !!
माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत की पूढील आदेशापर्यंत त्या परिसरात कुठलेही बांधकाम करु नये. हा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला आहे. मात्र लढाई कायम आहे आणि  या आंदोलनाला पूर्ण यश येईस्तोवर आम्ही सगळे असेच लढू. मनरो शाळा वाचली पाहिजे हे ध्येय साध्य होणारच.
अ‍ॅड. शशीर वंजारी 

पुढे लढण्याचे बळ आणि उर्जा मिळाली
मनरो शाळेत सुरू व्यवसायिक बांधकामाला न्यायालयाने दिले स्थागितीचे आदेश दिले आहेत, पुढील आदेशापर्यंत कोणतेही काम केले जाणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले. या आदेशामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून त्यांना पुढे लढण्याचे उर्जा मिळाली आहे. 
प्रमोद मानापुरे , आंदोलक 

खूप खूप आनंद झाला. सर्वांच्या मेहनतीला फळ आले. आंदोलकांची बाजू सत्य होती आणि  प्रयत्न प्रामाणिक होते. विजय नेहमीच सत्याचा होतो. सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचे आणि सर्व हितचिंतकाचे खूप खूप अभिनंदन. यानंतर विरोधक काय पवित्रा घेतात त्याबाबतीत सावध राहा. पण विजय तुमचाच होणार याची मला खात्री आहे. 
अनिल पाटील

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links