BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

470 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

25 वर्षांपासून शिष्यवृत्ती रकमेत वाढ नाही; लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

25 वर्षांपासून शिष्यवृत्ती रकमेत वाढ नाही; लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

- 1 हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती करण्यात यावी- अमर एकाड, अध्यक्ष, कॉप्स विद्यार्थी संघटन

 

न्यूज कट्टा/ भंडारा, 22 सप्टेंबर: शालेय शिक्षण विभागाअंतर्गत 1 लाख 6 हजार शाळांमध्ये 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 कोटी 25 लाख आहे. मात्र, शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2 लाखापेक्षा कमी आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षात फक्‍त 1,38,543 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्येत व रक्‍कमेत वाढच झालेली नाही.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमधील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2014-15 रोजी 3 हजार 395 वरून 2019-20 रोजी लाभार्थी विद्यार्थी संख्या 880 इतकी झाली आहे. 25 वर्षे झाली तरीही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या संचात व दरामध्ये वाढ झालेली नाही. सद्य:स्थितीत मंजूर 3 हजार 200 संच खूप कमी असल्याने हजारो गरजू शिष्यवृत्ती लाभापासून वंचित आहे. शिष्यवृत्ती संचात वाढ करून दहा हजार संच तत्काळ मंजूर करावे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 140 रुपये व विद्यार्थिनींना दरमहा 160 रुपये मिळतात. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अनुक्रमे 80 व 100 रुपये मिळतात.

या सर्व शिष्यवृत्ती दरामध्ये महागाई निर्देशांकनुसार वाढ करून कमीत कमी 1 हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती करण्यात यावी, अशी मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शासनाकडे केली आहे. पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमधील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2015-16 रोजी 82865 वरून 2019-20 रोजी लाभार्थी विद्यार्थी संख्या 64 हजार 394 इतकी झाली आहे. 2019-20 मधील शिष्यवृत्ती योजनेचे 9 कोटी 47 लाख 44 हजार रुपये अद्यापही शासनाने मंजूर केलेले नाहीत.

 

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी 9 हजार 600 विद्यार्थी संच मंजूर असतानादेखील लाभार्थी विद्यार्थी संख्या 2016-17 रोजी 9 हजार 486 वरून 2019-20 रोजी लाभार्थी विद्यार्थी संख्या 3069 इतकी झाली आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी संचालनालयाच्या स्तरावरून कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसारित केली जात नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे अमर एकाड यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. ती त्यांना उपलब्धही करून देण्यात आली. शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही एकाड यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links