BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

596 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

जिल्ह्यात 10 लाख नागरिकांनी घेतला लसीचा डोस

जिल्ह्यात 10 लाख नागरिकांनी घेतला लसीचा डोस

·        1 डोस घेणाऱ्यांची संख्या 7 लाख 46 हजार

·        2 डोस घेणाऱ्यांची संख्या 2 लाख 59 हजार

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, २४ सप्टेंबर 

कोविड 19 आजाराचा सामना करण्यासाठी ‘लस’ हाच एकमेव उपाय असून शासनाने नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवित आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाने वेग धरला असून लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 10 लाखाच्या वर गेली आहे.

सर्व नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली असून विशेष शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. ‘एकच मिशन, लसीकरण’ या ध्येयाने संपूर्ण यंत्रणा काम करत असून जिल्ह्यात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 10 लाख 5 हजार 814 एवढी झाली आहे. यापैकी 7 लाख 46 हजार 498 व्यक्तींनी पहिला तर 2 लाख 59 हजार 316 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

 

अ.क्र.

तालुका

पहिला डोस

दुसरा डोस

एकूण

1

भंडारा

173678

64189

237867

2

लाखांदूर

79349

22531

101880

3

लाखनी

87877

37526

125403

4

मोहाडी

93378

30448

123826

5

पवनी

95662

29686

125348

6

साकोली

91682

36483

128165

7

तुमसर

124873

38453

163326

            एकूण

746498

259316

1005814


‘लस’ हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे. सध्या युनायटेड किंगडम मध्ये तिसरी लाट सुरू आहे. या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे बाधितांची संख्या तीस टक्क्यांनी खाली आली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी झाले आहे. यावरून लसीकरणाचे महत्व लक्षात येते. आपल्याकडेही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ‘लस’ घेणारे व्यक्ती धोक्याबाहेर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links