विहिरीत पडलेल्या अस्वलाची सुटका
न्यूज कट्टा / यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा वन परीक्षेत्रांतर्गत शुक्रवार (दि. 11) भवानी येथे विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाच्या चमूने बाहेर काढून त्याची सुटका केली.
प्राप्त माहितीनुसार भवानी येथील रघुनाथ बेले यांच्या विहिरीत अस्वल पडल्याची माहिती कोर्टा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांना मिळताच अधिकारी विनायक खैरनार, हेमंत उबाळे, ओम प्रकाश पेन्दोर यांच्या मार्गदर्शनात वनपाल पांडे, अजय राऊत, वनरक्षक श्रीराम खंदारे, बालाजी गुट्टे, मंगल चव्हाण, अनिल राठोड यांच्या चमूने अस्वलाला उपलब्ध साहित्याच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.
अस्वलाच्या सुटकेसाठी दराटी पोलिस ठाणे, वन्यप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'