BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

204 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


मुंबई

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे


न्यूज कट्टा ब्युरो / मुंबई, २५ सप्टेंबर

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.उमेदवारांच्या अडचणी- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य- संकेतस्थळ अनेकदा हँग होते

आरोग्य विभागातील पदे
१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदीसार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्जगट क : २७२५ : ४,०५,०००

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links