BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1338 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय - मंत्री विजय वडेट्टीवार

26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय - मंत्री विजय वडेट्टीवार

गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधितांना न्याय

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, २६ सप्टेंबर 

भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली असून सदर 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आमदार नाना पटोले यांच्या पुढाकाराने ही बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती.

भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत मुंबई येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन असिम गुप्ता, जिल्हाधिकारी भंडारा संदीप कदम, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन भंडारा अर्चना यादव यांचे उपस्थितीत गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनाबाबत मुंबई येथे नुकतीच आढावा सभा घेण्यात आली.

अधिक्षक अभियंता गोसे प्रकल्प मंडळ, नागपूर यांचे कार्यालयाकडून भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणाऱ्या 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने ऐच्छिक पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. सदर 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी प्रदान करण्याबाबत सभेमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा अनेकांना लाभ होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links