BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

344 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


साकोली

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पावसाळी 'बर्ड अँड बटरफ्लाय' निरीक्षण उपक्रम

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पावसाळी 'बर्ड अँड बटरफ्लाय' निरीक्षण उपक्रम
 
प्रत्यक्ष पक्षीनिरीक्षणाद्वारे निसर्गमित्र शुभमला वाहिली आदरांजली

निसर्गउपक्रमात ग्लोबल नेचर क्लब व नेफडोचा सहभाग

 

न्यूज कट्टा ब्युरो / साकोली, २९ सप्टेंबर

 

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब शाखा साकोली ,कटकवार विद्यालय येथील राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या ग्लोबल नेचर क्लब साकोली तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सयूंक्त विद्यमाने पावसाळी 'बर्ड अँड बटरफ्लाय वॉच' उपक्रम घेण्यात आला.याच कार्यक्रमात निसर्गमित्र शुभम बघेल याच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी प्रत्यक्ष निसर्गमय उपक्रम व पक्षीनिरीक्षण उपक्रम आखून आदरांजली  वाहण्यात आली. यावेळी ग्लोबल नेचर क्लब कृष्णमूरारी कटकवार विद्यालयाचे संघटक प्रा. अशोक गायधने,नेफडोचे विभागीय अध्यक्ष असलेले दिवंगत प्राध्यापक प्रोफेसर बहेकार,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोलीचे प्रमुख गुणवंत जिभकाटे,निसर्गप्रेमी आदित्य शहारे, युवराज बोबडे, संकल्प वैद्य,पक्षीप्रेमी श्रुती गाडेगोने, वैष्णवी परतेकी,प्रणय रोकडे, रामकृष्ण मसराम, भोजराम देशमुख ,पूर्वा बहेकार,अथर्व बहेकार इत्यादी उपस्थित होते.

यावेळी प्रा.अशोक गायधने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर निसर्गमित्र शुभम बघेलच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.यावेळी प्रा. अशोक गायधने,प्रा.प्रोफेसर बहेकार यांनी स्व.शुभमच्या अनेक केलेल्या निसर्गकार्याच्या व सामाजिक कार्याच्या आठवणी जागवून सर्वांच्या स्मृती जागे केल्या.

यानंतर नागझिरा रोडवर व पाटबंधारे वसाहत तसेच  जैवविविधता केंद्र साकोली येथे विविध पक्ष्याच्या प्रजाती तसेच अनेक फुलपाखरांचे प्रजातीचे निरीक्षण व दर्शन प्रा अशोक गायधने यांचे मार्गदर्शनात घडविण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात आगमन होणारे पक्षी व पावसाळ्यात आढळणारे जसे चातक पक्षी,ड्रोनगो कुकू,ऍशी ड्रोनगो,स्पॉटेड मुनिया, रेड मुनिया,जेकोबीन ककू, गोल्डन बॅक वुडपेकर इत्यादी व इतर नेहमी आढळणारे पक्षी भारद्वाज,ब्राह्मणी मैना,रेडव्हेंटेड बुलबुल, लाफिंग डोव, रेड कॉलर डोव,शिक्रा, किंगफिशर,ग्रे हॉर्नबिल ,ऍशयी वरेन व्याबलर,सेव्हन सिस्टर व्याबलर,असे एकंदर 27 प्रकारचे पक्षी व कॉमन रोज,क्रिमसन रोज,प्लेन टायगर, डॅनिएड एगफ्लाय, ग्रेट एगफ्लाय,कॉमन इंडियन क्रो,लाईम बटरफ्लाय, कॉमन सेलर,बॅरोनेट,टवानी कॉस्टर तसेच इतर छोट्या आकारातील फुलपाखरे  व अनेक प्रकारातील चतुर किंवा ड्रॅगनफ्लाय  इत्यादी 18 प्रकारच्या फुलपाखरांचे दर्शन घडले.

पक्षीनिरीक्षण व फुलपाखरे यादी अहवाल टाळ्यांच्या गजरात पूर्वा बहेकार हिने कार्यक्रमाच्या शेवटी सादर केला तर श्रुती गाडेगोने व वैष्णवी परतेकी हिने इ-बर्ड कडे पक्षी नोंदी अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे संचालन आदित्य शहारे याने तर आभार प्रदर्शन श्रुती गाडेगोने हिने केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links