BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

115 Views

By न्यूज कट्टा


चंद्रपूर

ब्रह्मपुरी विभागात सापडला वाघाचा मृतदेह

ब्रह्मपुरी विभागात सापडला वाघाचा मृतदेह 

न्यूज कट्टा / चंद्रपूर 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागांतर्गत सिंदेवाही वनपरीक्षेत्रात आज शनिवार रोजी (दि. 12) एका नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्षेत्राधिकार गाजविण्यासाठी दोन वाघांच्या लढतीत या वाघाचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. 

सिंदेवाही वनपरीक्षेत्रात नवरगाव-रत्नापुर जवळील खांडला गावाजवळ वनरक्षक गस्तीवर असताना मुख्य रस्त्याच्या बाजूला आज सकाळी 9 वाजता दरम्यान एका नर वाघाचा मृतदेह आढळून आला.

वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती नुसार आतापर्यंत भारतात 76 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून शिकारी व इतर कारणांनी 103 वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार राज्यात यावर्षी 17 वाघांचा मृत्यू झाला असून मागील घटनेत गोंदिया जवळ एका वाघाचे मृत शरीर कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. 
 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links