BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

393 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुरक्षित - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांचे मत 

गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुरक्षित

- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांचे मत 

न्यूज कट्टा/ भंडारा, दि. 05 ऑक्टोबर: गरोदर मातांसाठी व प्रसूती नंतर महिलांसाठी कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून लसी विषयी मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यात कोविड-19 चे लसीकरण प्रथम डोज 86 टक्के पात्र लाभार्थी लोकसंख्येच्या प्रमाणात झालेले आहे. तरी पण यामध्ये गरोदर स्त्रिया व प्रस्तुती पश्च्यात मातेमध्ये लसीकरणचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रसूती पूर्व व प्रसूती पश्चात काळात कोविड-19 लसीकरण करणे हे सुरक्षित आहे व कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मातेला झालेल्या लसीकरणामूळे बाळाचेसुध्दा संरक्षण होते. सर्व गरोदर स्त्रियांनी लसीकरण करून घ्यावेत. या करीता जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links